दारव्हा पालिका शाळेचे ११० विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:38 AM2021-08-01T04:38:50+5:302021-08-01T04:38:50+5:30

शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याने दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत २ हजार २५० विद्यार्थी संख्या आहे. नियमित शिक्षणासोबत इतर अभ्यासक्रमावर ...

110 students of Darva Palika School pass NMMS examination | दारव्हा पालिका शाळेचे ११० विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण

दारव्हा पालिका शाळेचे ११० विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण

Next

शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याने दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत २ हजार २५० विद्यार्थी संख्या आहे. नियमित शिक्षणासोबत इतर अभ्यासक्रमावर भर दिला जात असल्याने विविध परीक्षेत विद्यार्थी चमकदार कामगिरी करतात. एनटीएससी शिष्यवृत्ती, नवोदय, एनएमएमएस आदींसह अनेक परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहे. येथील ११७ विद्यार्थी केंद्र सरकारच्या ४८ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे. आदेश जाधव हा विद्यार्थी विदर्भात प्रथम आला होता.

यावर्षी या परीक्षेत आठवीतील विद्यार्थी पात्र ठरले आहे. कोरोनामुळे शाळा बंद असताना नियमित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या शाळेने मात्र अडचणींवर मात करत ऑनलाईन शिक्षणाचे उत्तम नियोजन केले. नियमित अभ्यासक्रमाचा दर्जा सांभाळण्यासोबत हे यश संपादन केले. यासाठी मुख्याध्यापक रमेश राठोड व शिक्षकांनी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष बबनराव इरवे, उपाध्यक्षा प्रीती बलखंडे, मुख्याधिकारी धीरज गोहाड, शिक्षण सभापती गजेंद्र चव्हाण, प्रशासन अधिकारी योगेश डाफ, नगरसेवक, गटशिक्षणाधिकारी विलास जाधव यांनी कौतुक केले.

Web Title: 110 students of Darva Palika School pass NMMS examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.