शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीच्या ११ सदस्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 06:06 IST

सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी मेहतर समाज जात पंचायतीच्या सरपंचासह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्याची घटना पुसद येथे घडली.

पुसद (यवतमाळ) : सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी मेहतर समाज जात पंचायतीच्या सरपंचासह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्याची घटना पुसद येथे घडली. जात पंचायतीने एका परिवाराला समाजातून बहिष्कृत केले होते. या परिवाराने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेहतर समाज जात पंचायतीचे सरपंच भैय्यालाल टाक, गणेश डंगोरिया, आनंद डागर, दयाल डागर, सुनील टाक, संतोष टाक, संजू पवार, भारत डागर, प्रकाश नकवाल, श्याम टाक, रोहिदास डंगोरिया सर्व रा. नवलबाबा वार्ड पुसद अशी गुन्हा दाखल झालेल्या जात पंचायत सदस्यांची नावे आहे. अमर अशोक तुंडलायत हे १३ सदस्यीय कुटुंबासह नवलबाबा वार्डात राहतात.त्यांचे कुटुंबीय सतत भांडण करून समाजाची बदनामी करतात, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. याच कारणाने ७ डिसेंबर २०१७ रोजी जात पंचायतीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत सरपंच भैय्यालाल टाक व इतर ११ सदस्यांनी तुंडलायत कुटुंबाला जातीतून व समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्याशी समाजातील कोणत्याच व्यक्तीने बोलू नये, कोणतेही संबंध ठेऊ नये असा निर्णय घेण्यात आला. याबाबत अमर तुंडलायत यांनी पुसद शहर ठाण्यात जात पंचायतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करून ठाणेदार अनिलसिंह गौतम यांनी ११ सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.