शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

११ लाख आदिवासी कुटुंब कर्जमुक्त होणार; खावटी कर्जमाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 14:38 IST

आदिवासी अल्पभूधारक आणि शेतमजुरांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने १५ जानेवारीच्या बैठकीत घेतला. या निर्णयाने राज्यातील ११ लाख २५ हजार ९०७ कुटुंबांवरील कर्जाचा बोजा उतरणार आहे.

ठळक मुद्देनवीन योजनांच्या लाभाचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी अल्पभूधारक आणि शेतमजुरांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने १५ जानेवारीच्या बैठकीत घेतला. या निर्णयाने राज्यातील ११ लाख २५ हजार ९०७ कुटुंबांवरील कर्जाचा बोजा उतरणार आहे. सोबतच नवीन योजनांच्या लाभासाठीही हे कुटुंब पात्र ठरणार आहेत. अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी यासाठी सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता.आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसात रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे आदिवासी कुटुंबांसमोर आर्थिक अडचण निर्माण होते. या काळात त्यांची उपासमार होऊ नये यासाठी १९७८ पासून खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाला फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून २०१३-१४ पर्यंत महामंडळामार्फत खावटी कर्ज वाटप करण्यात आले.सन २००९ ते २०१४ या कालावधीत आदिवासी लाभार्थ्यांना २४४.६० कोटींचे कर्ज देण्यात आले. त्यावर ११६.२७ कोटी इतके व्याज चढले. ही एकूण २६१.१७ कोटी इतकी रक्कम माफ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याचा लाभ ११ लाख २५ हजार ९०७ आदिवासी अल्पभूधारक व शेतमजुरांना होणार आहे.२४५ कोटीला मान्यताआदिवासी उपयोजना अंतर्गत २०१८-२०१९ या वित्तीय वर्षात शेतकरी सन्मान योजनेसाठी ९४० कोटी इतकी तरतूद करण्यात आली. यातून २४४.६० कोटी इतकी रक्कम खावटी कर्ज खर्च तसेच हा निधी आदिवासी विकास महामंडळाला कर्ज परतफेड म्हणून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख या नात्याने मागील सहा महिन्यांपासून नियमित पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, आदिवासीमंत्री, वित्तमंत्री आदींसोबत चर्चा, बैठक झाली. अखेर मंत्रिमंडळात कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने आदिवासी बांधवांना न्याय मिळाला.- आमदार प्रा.डॉ. अशोक उईके,समिती प्रमुख, अ.जमाती कल्याण समिती विधिमंडळ मुंबई

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना