शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

११ कर्मचारी सांभाळतात सात तालुक्यांचा कारभार

By admin | Updated: December 18, 2014 02:27 IST

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत पुसद येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

पुसद : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत पुसद येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले आहे. परंतु येथे कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा असून केवळ ११ कर्मचारी सात तालुक्यांचा कार्यभार सांभाळत आहे. त्यामुळे एकेका कर्मचाऱ्याकडे तब्बल पाच ते सहा विभागांचा प्रभार असून कामाचा अतिरिक्त ताण त्यांना सहन करावा लागत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये शासनाच्या या उदासीन धोरणाप्रती तीव्र असंतोष धुमसत आहे. जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी पांढरकवडा व पुसद येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यरत आहे. पुसद येथे आॅगस्ट २०१२ मध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा, नेर आणि आर्णी अशा सात तालुक्यातील आदिवासी जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या जातात. यापूर्वी जिल्ह्यात केवळ पांढरकवडा येथे एकमेव कार्यालय होते, हे विशेष! या कार्यालयामार्फत न्युक्लिअस बजेट योजना, वैयक्तिक लाभाची योजना, विशेष केंद्रीय सहाय्य योजना, सबलीकरण योजना, ठक्करबाप्पा योजना आदी विविध लाभांच्या योजनांसह प्रशिक्षणाच्या योजनाही राबविण्यात येतात. या कार्यालयात एकूण ६४ मंजूर पदे असून त्यातील केवळ ११ पदे भरलेली आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रात्री १० वाजेपर्यंत तसेच सुटीच्या दिवशीसुद्धा कामे करावी लागत असल्याचे वास्तव आहे. या कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकारी तीनपैकी तीन तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) चार पदे असताना चारही रिक्त आहे. वर्ग २ च्या मंजूर सात पदांपैकी सातही पदे रिक्त आहे. सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कार्यालय, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ही सर्वच पदे रिक्त आहे. त्याचप्रमाणे एक संशोधन सहाय्यक, एक वरिष्ठ निरीक्षक, उपलेखापाल, आदिवासी विकास निरीक्षकाची तीन पदे, वरिष्ठ लिपिकांची आठ पैकी चार पदे, एक सांख्यकी सहाय्यक, एक लघु टंकलेखक, कनिष्ठ लिपिकांच्या २० पैकी १८ जागा तसेच वाहनचालकांची दोन्ही पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या मंजूर ५० पदांपैकी तब्बल ४२ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ च्या मंजूर सहा पदांपैकी चार पदे रिक्त आहे. यामध्ये शिपायांची चारही पदे रिक्त आहे. या कार्यालयात एकूण मंजूर ६४ पदांपैकी ५३ पदे रिक्त असून केवळ ११ कर्मचाऱ्यांवर सात तालुक्यांचा कारभार चालविला जातो. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण येत असून शासनाच्या आदिवासी बांधवांसाठी असलेल्या योजना वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)