शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

१०७ शेतकरी आत्महत्या अपात्र

By admin | Updated: June 19, 2015 02:16 IST

कर्जबाजारीपणा व नापीकीने कंटाळून तालुक्यात गत १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

महागाव : कर्जबाजारीपणा व नापीकीने कंटाळून तालुक्यात गत १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मात्र यातील तब्बल १०७ शेतकरी मदतीस अपात्र ठरले. शासकीय निकषात बसत नसल्याने शासनाने या शेतकरी आत्महत्या नाकारल्या आहेत. त्यांचे कुटुंब आज उघड्यावर आले आहे. महागाव तालुक्यात ६० हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी ५० हजार हेक्टर कोरडवाहू आहे. ३० हजार शेतकऱ्यांचा प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय आहे. गत काही वर्षात नापिकी आणि कर्जबाजारीपणाने शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची झाली आहे. अशा स्थितीत २००१ ते जून २०१५ पर्यंत १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुख्य कारण म्हणजे कर्जबाजारीपणा होय. कर्जाचा हा डोंगर धरणाचे पाणी वेळेवर न मिळणे, बनावट बियाणे आणि खंडीत वीज पुरवठा यामुळे वाढत गेला. तालुक्यात वेणी, वडद, पिंपळगाव, अमडापूर, बेलदरी आदी प्रकल्प आहेत. १० हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा अधरपूस प्रकल्प आहे. परंतु पूर्ण क्षमतेने सिंचन होत नसल्याने तालुक्याच्या उत्पादनात घट होत आहे. यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. धरणाच्या पाण्यासाठी आंदोलने झालीत परंतु तिळमात्र सुधारणा झाली नाही. गत काही वर्षात बोगस बियाण्यातून शेतकरी नागवला गेला. भारनियमनाने ओलित करणे शक्य झाले नाही. अशात शेतकऱ्यांच्या हाती विषाचा प्याला कधी आला हेच कळले नाही. महागाव तालुक्यात १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकरी आत्महत्येनंतर मदतीसाठी काही निकष शासनाने घालून दिलेले आहे. त्या निकषांची पूर्तता या अडाणी शेतकऱ्यांनी केली नाही. म्हणून १०७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाने फेटाळल्या आहेत. शेतकरी आत्महत्या खरी की खोटी हे ठरविण्यासाठी जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीने नुकताच हा निर्णय दिला आहे. शासनाच्या मदतीशिवाय आत्महत्या केलेल्यांच्या विधवा पत्नीने आपला संसार सांभाळला आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अपवाद वगळता अनेक महिलांनी आता शेती करण्यासाठी कंबर कसली आहे. (शहर प्रतिनिधी)