शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातल्या १५ उत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या १० जणांची बाजी

By अविनाश साबापुरे | Updated: September 18, 2023 20:13 IST

व्यावसायिक प्रशिक्षणात कामगिरी : यवतमाळ आयटीआयचा राज्यात झेंडा

यवतमाळ : एकेकाळी दुर्लक्षित असलेले आयटीआयमधील विविध अभ्यासक्रम आता विद्यार्थीप्रिय होत आहेत. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रँक निश्चित करणारी परीक्षा नुकतीच पार पडली. त्यात महाराष्ट्रातून निवडलेल्या १५ अव्वल विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या तब्बल १० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशात यवतमाळची मान उंचावली आहे.

विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी यवतमाळच्या शासकीय आयटीआयचे विद्यार्थी आहेत. शासनामार्फत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती. यात राज्यातील सर्वच आयटीआयमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून महाराष्ट्रातील अव्वल १५ विद्यार्थी नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. या १५ पैकी १० जण यवतमाळचे आहेत, हे विशेष. यामध्ये स्नेहल राठोड, अनुराग मनवर, मनिषा मेश्राम या तिघांनी ६०० पैकी ५९९ गुण घेत पहिली रँक मिळविली. अंकिता आंबटवार, ऋतुजा आरेकर यांनी ५९८ गुणांसह दुसरी रँक मिळविली. तर गायत्री चौधरी, रोहीत खामनकर, कुणाल गवळी, पूजा कपाट, विशाल पोपळघट या विद्यार्थ्यांनी ५९७ गुणांसह तिसरी रँक पटकावली आहे. 

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदवी व ट्रॉफी देऊन १७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे सत्कार करण्यात आला. यवतमाळ शासकीय आयटीआयचे प्राचार्य विनोद नागोरे, व्यवसाय निदेशक देऊळकर, संजय पोटे, एफ. डी. राठोड, अनिल अनंतवार आदी मार्गदर्शकांचे परिश्रम यानिमित्ताने सत्कारणी लागले आहेत.