शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

पिस्तूल दाखवून १० लाखांचा दरोडा

By admin | Updated: May 31, 2015 02:12 IST

शुक्रवारी रात्री ८ वाजता येथील रामनगरात शासकीय कंत्राटदार जयंत वसंतराव चिद्दरवार यांच्या घरी दरोडा घालण्यात आला.

शासकीय कंत्राटदार : मारहाण करून घरात डांबलेपुसद : शुक्रवारी रात्री ८ वाजता येथील रामनगरात शासकीय कंत्राटदार जयंत वसंतराव चिद्दरवार यांच्या घरी दरोडा घालण्यात आला. पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर नऊ लाख रुपयांचा ऐवज लूटून नेण्यात आला. दरोडेखोर संख्येने सहा व ३० ते ३५ वयोगटातील होते. घटनेच्या वेळी जयंत, त्यांची पत्नी, मोलकरीण आणि तिचा मुलगा हे चौघेच घरात होते. हॉलमध्ये टीव्ही पाहत असलेला मोलकरणीचा मुलगा रोहित शेवकर (१४) याला पिस्तुलचा धाक दाखवीत दरोडेखोरांनी जयंत यांच्या विषयी विचारणा केली. मुलगा त्यांना जयंत यांच्या खोलीकडे घेऊन गेला. तेथे जयंत यांच्यावर दोन दरोडेखोरांनी पिस्तुल रोखत त्यांच्या आणि पत्नी अर्चना (४५) यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यांना इतर दागिन्यांविषयी विचारणा करून ते ठेवलेले असलेल्या वरच्या माळ्यावरील खोलीत दरोडेखोरांनी चिद्दरवार दाम्पत्याला नेले. तिजोरीची चाबी घेऊन त्यातील दागिने आणि रोकड काढून घेतली. या प्रकाराने भेदरलेल्या मोलकरीण अर्चना शेवकर (४०) यांनी घराच्या मागील दाराने भाडेकरू सिंग यांचे घर गाठले. ताई सिंग यांनी ही माहिती भ्रमणध्वनीवर पतीला कळविली. याच वेळी चिद्दरवार यांच्या घरातील भ्रमणध्वनी खणखणल्याने ‘कुणी येणार आहे का’ अशी विचारणा दरोडखोरांनी केली. त्यावर भोजनासाठी आठ-दहा मित्र येत असल्याचे चिद्दरवार यांनी सांगताच दरोडेखोर दाराला बाहेरुन कडी लावून पसार झाले. त्यानंतर जयंत यांनी गॅलरीतून मदतीसाठी धावा केला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, ठाणेदार रमेश सोनुने घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने उमरखेड रोडकडे माग दाखविला. जयंत चिद्दरवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भांदविच्या ३९५ कलमान्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यातील प्रत्येकी दोघे पुसद व खंडाळ्याचे तर एक जण दराटीचा आहे. पोलिसांना अद्याप दरोडखोरांचा ‘क्ल्यू’ नसला तरी भाषेवरून ते मराठवाड्यातील नव्हे तर वैदर्भीय असावे, असा अंदाज ठाणेदार रमेश सोनुने यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (प्रतिनिधी)