शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

11 काेटींच्या कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

पेट्राेल, डिझेलचे दर वाढल्याने प्रचंड महागाई वाढली आहे. बांधकाम साहित्याचे दरही वाढले आहेत, अशा स्थितीत साहजिकच बांधकाम खर्चाचे बजेट वाढणार आहे, याचा कुठेही नगरपरिषद बांधकाम विभागाने उघडलेल्या निविदांवर प्रभाव दिसून येत नाही. काम मिळविण्यासाठी कंत्राटदारांनी २५ ते ३२ टक्के कमी दराची निविदा भरली आहे. बांधकाम विभागाने कामाचे बजेट काढताना, त्याच चुका ठेवल्या की काय, अशी शंका उपस्थित हाेत आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : दलित वस्तीतील कामाच्या ३१ टक्के कमी दरांच्या निविदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेत प्रशासकीय अनागाेंदी तयार झाली आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे. काेणत्याच कामाचे याेग्य नियाेजन केेले जात नाही. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या कामांची केवळ कागदाेपत्रीच गुणवत्ता दर्जेदार आहे. आता दलित वस्तीअंतर्गत ६२ कामे केली जात आहेत. यासाठी प्राप्त निविदा बांधकाम विभागाकडे उघडल्या आहेत. त्यातील दर हे ३२ टक्के कमीचे आहेत. यावरून कामांची गुणवत्ता खरच राखली जाईल का, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पेट्राेल, डिझेलचे दर वाढल्याने प्रचंड महागाई वाढली आहे. बांधकाम साहित्याचे दरही वाढले आहेत, अशा स्थितीत साहजिकच बांधकाम खर्चाचे बजेट वाढणार आहे, याचा कुठेही नगरपरिषद बांधकाम विभागाने उघडलेल्या निविदांवर प्रभाव दिसून येत नाही. काम मिळविण्यासाठी कंत्राटदारांनी २५ ते ३२ टक्के कमी दराची निविदा भरली आहे. बांधकाम विभागाने कामाचे बजेट काढताना, त्याच चुका ठेवल्या की काय, अशी शंका उपस्थित हाेत आहे. बांधकामाचा अपेक्षित खर्च काढूनच निविदा प्रसिद्ध केली जाते. त्या अपेक्षित खर्चाच्या ३० टक्के कमी दरात ठेकेदार गुणवत्तेचे काम करतील, ही अपेक्षा ठेवणे म्हणजे खुळचटपणाच आहे. कामांची गुणवत्ता राहत नसल्याने वर्षभरातच नाली, रस्ते उखडून जातात. नंतर त्या परिसरातील कामासाठी किमान पाच वर्षांपर्यंत निधी मिळत नाही. त्यामुळे तेथील समस्या तशीच कायम राहते. केवळ टक्केवारीचे गणित जुळल्याने कंत्राटदार बिनधास्त हाेऊन कमी दराची निविदा दाखल करतात.  हा प्रकार आता राजराेसपणे सुरू झाला आहे.  कामाच्या गुणवत्तेवर पालिकेत  कुणीच बोलताना दिसत नाही. यामुळे फावत आहे. 

जनतेच्या पैशांची उधळण जनतेकडून कर स्वरूपात वसूल केलेल्या पैशाची निकृष्ट दर्जाच्या कामावर उधळण केली जात आहे, हा प्रकार थांबविण्यासाठी काेणीच पुढे येताना दिसत नाही. आता ११ काेटींच्या दलितवस्ती कामांमध्ये काेणाला किती खिरापत मिळणार, हे निश्चित झाल्याने कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यास तयार नाही, या  निविदा उघडल्या असून, अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे. यात काेणी गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला की, ज्यांचे हितसंबध अडकले आहेत, ते विकासाला विराेध अशी आराेळी ठाेकणे सुरू करतात. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून यवतमाळ नगरपरिषदेत सुरू आहे.

कमी दराची निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांकडून गुणवत्ता सुरक्षा ठेव घेतली जाते. कामाचा दर्जा सुमार असल्यास ही रक्कम जप्त करण्यात येते. शहरातील कामाच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. पालिका प्रशासन व बांधकाम विभागाचे यावर पूर्ण नियंत्रण राहणार आहे. - महेश जामनोर, प्रभारी मुख्याधिकारी

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग