शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

७३ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षातच ‘झेडपी’च्या अधिकारांवर टाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 13:40 IST

राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली जात असल्याने ‘झेडपी’च्या पदाधिकाºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशातील पंचायत राज संस्थांना अधिक अधिकार मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरूस्ती केली. राज्यातील अधिकाराचे विकेंद्रीकरण करीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना अधिकार बहाल करणाºया ७३ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षातच राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली जात असल्याने ‘झेडपी’च्या पदाधिकाºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.ग्रामविकास विभागाने अलिकडच्या काळात पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था तथा मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली आहे. पंचायत राज संस्थांना बळकटी देण्यासाठी, राज्यातील अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरूस्ती केली. त्यानुसार राज्यातील विविध २९ विषयांचे अधिकार जिल्हा परिषदांना मिळणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १४ विषय जिल्हा परिषदेकडे सोपविले आहेत. अलिकडच्या काळात या अधिकारातही कपात केली तर काही अधिकार राज्य सरकार परत घेत असल्याचे दिसून येते. यंदा ७३ व्या घटनादुरूस्तीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात घटनादुरूस्तीनुसार सर्व अधिकार मिळतील, या आशेवर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाºयांना अधिकार कपातीला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग निर्मिती करण्याचा अधिकार आता पालकमंत्र्यांच्या समितीला देण्यात आला आहे. पदभरती राज्य शासन करणार, शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावरून होत आहेत. कृषी विभाग तर सेस फंडापुरताच मर्यादीत ठेवला आहे. विशेष घटक योजना बाद करण्यात आली. कृषी सेवा केंद्र परवाना, बियाणे विक्री परवाना, किटकनाशक विक्री परवाना, कृषी अभियांत्रिकीकरण योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे यापूर्वीच देण्यात आल्या तर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत बळकटीकरण योजनाही हस्तांतरीत झाली आहे. निधी कपातही केली जात असल्याने ‘झेडपी’च्या पदाधिकाºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी लवकरच दाद मागणार आहेत, अशी माहिती जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद