शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी सीईओंचे शिक्षकांना पत्र; पटसंख्या वाढविण्याचा दिला मंत्र

By संतोष वानखडे | Updated: April 16, 2024 16:10 IST

उन्हाळी सुटीत गुरूजींना दिला गृहपाठ : शाळा सुरू झाल्यानंतर सीईओंकडून होणार उजळणी

वाशिम : जिल्हा परिषद शाळांचा भौतिक व शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैभ वाघमारे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षकांना सविस्तर पत्र लिहिले. त्यानुसार पटसंख्या वाढविण्याबरोबरच उन्हाळी सुटीत शिक्षकांना अध्ययन निष्पत्ती व पाठ्यक्रमांचे सखोल अध्ययन करावे लागणार आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ७७९ प्राथमिक शाळा आहेत. मात्र, काही शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या आहे. अनेक जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावत असल्याने जिल्हा परिषद शाळेऐवजी खासगी शाळेत पाल्याचा प्रवेश घेण्याला ग्रामीण भागातील पालकही पसंती देत असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याबरोबरच शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी उन्हाळी सुट्टीत शिक्षकांसाठी कृती आराखडा तयार केला. 

सर्व शिक्षकांना पत्र पाठवून आगामी शैक्षणिक सत्रासाठी अध्ययन निष्पत्ती व पाठ्यक्रमांचे सखोल अध्ययन करण्याच्या सूचनाही दिल्या. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर, सीईओ हे रँडमली कोणत्याही शिक्षकाची निवड करून त्यांना बोलावतील. पाठ्यक्रमातील व अध्ययन निष्पतीतील सर्व बाबी येतात की नाही हे तपासणार असल्याने शिक्षकांना गृहपाठ करावा लागणार आहे. गृहपाठ कच्चा असणाऱ्या शिक्षकाची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असा इशाराही सीईओ वाघमारे यांनी दिला.

कोणती तीन उल्लेखनीय कामे करावी लागणार?- ज्या शिक्षकांचा पट ३० पेक्षा कमी आहे, त्यांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये किमान ३० पेक्षा अधिक पटसंख्या कशी होईल याचे काटेकोर नियोजन करावे.- मुलांचा कल मोफत झेडपीच्या शिक्षणापासून, खाजगी शाळांकडे जाण्यामागे मुख्य कारण म्हणजे अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये शिक्षक कमी पडत आहेत. त्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्याकरिता अध्ययन निष्पत्तीच्या मजकुराच्या अनुषंगाने जि.प. शाळेच्या प्रत्येक भिंती बोलक्या कराव्या. - उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने मजकूर उपलब्ध करून दिला जाईल. अध्ययन निष्पत्तीच्या संबंधित मजकुराचा तसेच पाठ्यक्रमांचा सखोल अभ्यास करावा. सुट्ट्या संपल्यानंतर या गृहपाठाची उजळणी घेतली जाईल. 

टॅग्स :Schoolशाळा