शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुक; सायंकाळी ४ पर्यंतच करता येणार जाहीर प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:11 IST

Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections; निर्बंधानुसार उमेदवारांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच जाहीररित्या प्रचार करता येणार आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै रोजी मतदान होत असून, जिल्ह्यात निर्बंध लागू झाले आहेत. या निर्बंधानुसार उमेदवारांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच जाहीररित्या प्रचार करता येणार आहे. सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी लागू असल्याने उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचार करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रचारावर मर्यादा आल्याने इच्छुक उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे.‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाने जिल्ह्याचा समावेश ‘अनलॉक’च्या तिसऱ्या स्तरात केल्याने २८ जूनपासून जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू आहे. निर्बंधाच्या या कालावधीत पोटनिवडणूक होत असल्याने प्रचारावर मर्यादा आल्या आहेत. जाहीर प्रचारसभा, भव्य रॅली काढता येणार नसून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोजक्याच समर्थकांच्या उपस्थितीत प्रचार करता येणार आहे तसेच गर्दी होतील, असे कार्यक्रमही घेता येणार नाही. सायंकाळी ४ वाजेनंतर उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचार करावा लागणार आहे. दरम्यान, प्रचारावर मर्यादा आल्याने उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कमी कालावधीत आणि तेही मोजक्याच समर्थकांच्या उपस्थितीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागणार आहे.

घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणारनिर्बंधाच्या कालावधीत पोटनिवडणूक होत असल्याने जाहीर प्रचारावरही मर्यादा आल्या आहेत. समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढता येणार नसून घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्वाधिक धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...तर गुन्हा दाखल होण्याची भीतीआचारसंहिता तसेच कोरोनाविषयक नियम डावलून जाहीर प्रचार सभा, समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढली आणि याबाबत कुणी तक्रार केली तर गुन्हा दाखल होण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे रॅली, जाहीर प्रचार सभांना आवर घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.

राज्य शासनाने वाशिम जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात केल्याने, २८ जूनपासून जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील नियमावली लागू झाली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू आहे. जाहीर प्रचार सभा, रॅली काढता येणार नाही. घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. कुठेही ५० पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होईल, असा कार्यक्रम घेता येणार नाही. नवीन नियमावली व आचारसंहितेचे पालन करून प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे.- शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदElectionनिवडणूक