शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पद गमावलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा पोटनिवडणुकीत लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:50 IST

Washim ZP by-election पुन्हा बाजी मारण्यासाठी त्यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे मत राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ओबीसी) सहा पंचायत समित्यांमधील २७ व जिल्हा परिषदेतील १४ सदस्यांची पदे रिक्त झाल्याचा आदेश पारित केला. यामुळे ओबीसी आरक्षण पूर्णत: शून्यावर आले असून, प्रत्यक्ष पोटनिवडणुकीद्वारे ही पदे आता सर्वसाधारण प्रवर्गातून भरली जाणार आहेत. पायउतार झालेले सदस्य या निवडणुकीला सामोरे जातील; पण पुन्हा बाजी मारण्यासाठी त्यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे मत राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक ७ जानेवारी २०२० रोजी झाली होती. ८ जानेवारीला मतमोजणी होऊन २७ टक्के आरक्षणानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातून जिल्हा परिषदेत १४, तर पंचायत समित्यांमध्ये २७ सदस्य आरूढ झाले. मात्र, ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याप्रकरणी दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी आदेश पारित करून आधी वाशिम जिल्हा परिषदेतील १४ आणि वाशिम, मंगरूळपीर, रिसोड व मालेगाव या चार पंचायत समित्यांमधील १९ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल ठरविले. त्यानंतर १६ मार्च २०२१ रोजी धडकलेल्या आदेशात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील जागा कमाल आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेत असोत अथवा नसोत, न्यायालयाच्या आदेशाने संबंधित सर्व जागा रिक्त झाल्याचे विधिमत प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील कारंजा आणि मानोरा येथीलही प्रत्येकी चार, अशा एकूण आठ पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण आता शून्यावर आले असून, पोटनिवडणुकीद्वारे सर्वसाधारण प्रवर्गातून सदर जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पायउतार झालेल्या ओबीसी सदस्यांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याची माहिती आहे, तसेच पुन्हा निवडणूक झाल्यास त्यालाही सामोरे जाण्याच्या ते तयारीत आहेत. मात्र, गतवेळच्या निवडणुकीत थोड्या फरकाने पराभव झालेल्या उमेदवारांचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. याशिवाय पायउतार झालेल्यांपैकी ज्यांनी वर्षभरात विकासाला दुय्यम स्थान दिले, असे तत्कालीन सदस्य अडचणीत सापडणार आहेत, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदPoliticsराजकारण