शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडकरांनी केली पन्हाळ-पावनखिंड पद भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:45 IST

रिसोड : मुसळधार पाऊस, बोचरा वारा व घनदाट जंगल, चिखलाच्या वाटा अशा वातावरणात हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित पन्हाळ गढ ते पावनखिंड परिसर पद भ्रमंती मोहीम रिसोडच्या युवा मावळ्यांनी यशस्वी पूर्ण केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : मुसळधार पाऊस, बोचरा वारा व घनदाट जंगल, चिखलाच्या वाटा अशा वातावरणात हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित पन्हाळ गढ ते पावनखिंड परिसर पद भ्रमंती मोहीम रिसोडच्या युवा मावळ्यांनी यशस्वी पूर्ण केली. यात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह माजी नगराध्यक्ष मिळून २१ जण सहभागी झाले होते, अशी माहिती इतिहासकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी गुरुवारी दिली.हिंदवी परिवाराचे सर्वेसर्वा इतिहासकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. नेवापुरातील विर शिवा काशिद यांच्या समाधी व पुतळ्याचे पुजन झाल्यानंतर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे पूजन झाले. राजदिंडी मार्गे १३ जुलै रोजी या मोहिमेस सुरुवात झाली. तुरकवाडी मसाई पठार, कुंबार वाडी, खोतेवाडी हा असा मोहिमेचा पहिला टप्पा होता. दुसºया दिवशी १४ जुलै रोजी खोतेवाडीतून दुस?्या टप्यातील मोहिमेस व पद भ्रमंतीस सुरुवात झाली. मांडलाईवाडी, आंबेवाडी रिंगेवाडी धनगरवाडा मार्गे सायंकाळी सहाच्या सुमारास मोहीमेतील वीर पांढरेपाणी येथे पोहचले. पन्हाळगडापासून निघालेली पद भ्रमंती झिम्माड पाऊस अंगाला झोंबणारा गार वारा, हिरवे गार डोंगर, दºयाखोºयातून खळखळणारे छोटे मोठे धबधबे, जमिनीवर उतरणारे ढग धुक्यात हरवलेली मसाई पठार अनुभवली. हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित या मोहिमेमध्ये राज्यासह पर राज्याच्या शिव प्रेमिंचा सहभाग होता या पद भ्रमंतीमध्ये मुख्याधिकारी गणेश पांडे, माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख, माजी न.प. उपाध्यक्ष सदाशिव चौधरी, तलाठी स्वप्नील धांडे, धनंजय काष्टे, विकास इरतकर यांच्यासह एकवीस युवकांचा सहभाग होता. मावळ्यांनी छत्रपति शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणा देत पद भ्रमंती चा मार्ग होती. १५ जुलै रोजी पांढरे पाणी येथे इतिहासकार डॉ. शेटे यांनी शिवाजी महाराज यांनी पन्हाळागड ते पावनखिंड एका रात्रीत केलेल्या प्रवासाचे वर्णन पोवाडया तून सांगितले. यावेळी शिवप्रेमी सह्याद्री च्या धो-धो पावसात मंत्रमुग्न्न झाली होती. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड