रिसोड (जि. वाशिम) : : एका १७ वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करुन त्रास दिल्याप्रकरणी २0 वर्षीय युवकास अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची घटना ८ जुलै रोजी सिव्हील लाईन रोड येथे घडली होती. त्या युवकास ९ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. रिसोड येथील मुस्कान नामक ऑटोधारक शेख जावेद शेख तामर हा युवक युवतीशी जवळीक साधण्याच्या दृष्टीने सतत पाठलाग करीत होता. ८ जुलै रोजी पाठलाग करुन त्रास दिल्याने याबाबत युवतीच्या वडिलाने रिसोड पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर तक्रार दाखल केल्याने त्याला अटक करुन त्याच्यावर कलम ३५४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
‘त्या’युवकास न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: July 10, 2015 01:19 IST