वाशिम: तालुक्यातील काटा येथील झोपडपट्टी परिसरात ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये १० मे रोजी मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. काटा (ता.जि.वाशिम) येथील झोपडपट्टी परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती ठाणेदार सुनील अंबुलकर यांना मिळाली. त्याआधारे बीट जमादार वसंत तहकिक, नप्ते, शैलेश ठाकूर व दिलीप देवकते यांच्या पथकाने जुगारावर छापा टाकला. या छाप्यामध्ये रमेश गोविंदा कांबळे, अरूण नागोराव चव्हाण व जनार्दन रामचंद्र कांबळे या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५२ ताश पत्ते व रोख ११२० रूपये जप्त केले. या घटनेचा अधिक तपास बिट जमादार तहकिक करीत आहेत.
काटा येथेही जुगारावर धाड; तिघांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 11, 2017 06:52 IST