शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर; अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:41 IST

Washim News परीक्षा तीन महिन्यांवर आल्या असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून एप्रिल, मे महिन्यात परीक्षा होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, तीन महिन्यांवर परीक्षा आल्या असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: १० महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून वर्ग सुरू झाल्याने १० महिन्यांचा अभ्यासक्रम सहा महिन्यांत पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. 

कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र जरी प्रभावित झाले असले तरी ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. २३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. विहित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले आहे. - आर.बी. गरतकर, प्राचार्य

कोरोनाकाळात ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया पार पडली आहे. यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली आहे. दहावी, बारावीचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण होत आला आहे. कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. - कल्याण महाराज जोशी, मुख्याध्यापक, 

तीन महिन्यांवर परीक्षा आल्या आहेत. दरवर्षी बारावीचा अभ्यासक्रम साधारणत: जून ते फेब्रुवारी या महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला कमी कालावधी मिळाला आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांची कसरत होत आहे.          -मनीष जाधव, विद्यार्थी 

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा