शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

शिकस्त इमारतीतुन चालतो सुकांडा ग्रामपंचायतचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:55 IST

राजुरा (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सुकांडा येथे गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतला सुस्थितील इमारतच नाही. परिणामी एका छोटेखानी शिकस्त इमारतीतुनच सरपंच व सचिवांना गावचा कारभार बघावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सुकांडा येथे गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतला सुस्थितील इमारतच नाही. परिणामी एका छोटेखानी शिकस्त इमारतीतुनच सरपंच व सचिवांना गावचा कारभार बघावा लागत आहे.मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सुकांडा गावची जवळपास तीन हजारावर लोकसंख्या आहे. ग्रामपंचायतचा कारभार बघण्यासाठी सुसज्ज अशा ग्रामपंचायत भवनाची गरज असताना एका दहा बाय दहा आकाराच्या टिनपत्राच्या खोलीतुन सरपंच व सचिवांना कामकाज करावे लागत आहे.दरमहा आयोजित मासीक सभेसाठी सदस्यांना अपुºया जागेतच खुर्च्या टाकून बसावे लागते. ग्रामसभा अथवा इतर सभा घ्यावयाची झाल्यास जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उघडयावर घ्यावी लागत असल्याचे वास्तव आहे. ग्राम पंचायतची शिकस्त इमारत ६० वर्षापेक्षाही अधिक कालावधीची जुनी आहे. पावसाळयाचे दिवसात भितीचा मलबा आपोआप खचतो. सदरहू इमारत जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असून शाळेतील विद्यार्थी मधल्या सुटीत अथवा फावल्या वेळेत या इमारती लगतच खेळत असल्याने एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देवून सुकांड येथे ग्राम पंचायत भवन देण्याची मागणी होत आहे. 

 सुकांडा येथील ग्राम पंचापयत कार्यालयाची छोटेखानी इमारत शिकस्त झाली आहे. या ठिकाणी कामकाज करणे गैरसोयीचे ठरत आहे. सुसज्ज ग्राम पंचायत भवन मिळावे, अशी मागणी आहे.- कैलासराव घुगे सरपंच, सुकांडा

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत