शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

सर्वेक्षणाला दहा महिने उलटूनही ‘रिंग रोड’चे काम प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 6:10 PM

बुलडाणा, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यांमधून येणारी वाहने वाशिम शहराच्या बाहेरूनच वळविण्यासाठी ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्याबाहेरून होणाºया जडवाहतूकीने शहरांतर्गंत वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून रिंग रोडचे काम प्रस्तावित करण्यात आले. त्यानुसार, मार्च २०१८ या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर कामाचे सर्वेक्षणही झाले. त्यानंतरचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले. मात्र, सर्वेक्षणाला दहा महिने उलटूनही ‘रिंग रोड’चे काम अद्याप पुढे सरकू शकले नाही.बुलडाणा, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यांमधून येणारी वाहने वाशिम शहराच्या बाहेरूनच वळविण्यासाठी ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आलेला आहे. मार्च २०१८ ते जुलै २०१८ या कालावधीत झालेल्या रोडच्या सर्वेक्षणावर १४ लाख ६० हजार ५९७ रुपयांचा खर्च देखील झाला. याअंतर्गत रिसोड रोडनजिकच्या झाकलवाडीपासून काटा-कोंडाळा रोड, जागमाथा, सुरकंडी शिवार, पंचाळा शिवार, हिंगोली रोडवरील अनंत सहकारी सुतगिरणीपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणात ‘रिंग रोड’मुळे बाधीत होणारी घरे, शेती यासह अतिक्रमण आदी स्वरूपातील माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळविली. त्यानंतर मात्र प्रत्यक्ष कामास अद्यापपर्यंत सुरूवात झालेली नाही. त्यामुळे ज्या मूळ उद्देशाने ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आला, तो सफल झाला नसल्याचे दिसून येत आहे. शहरांतर्गत वाहतूक विस्कळित; अपघातही अनियंत्रित!वाशिमला अद्यापपर्यंत वळणमार्ग तयार झाला नसल्याने अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली नांदेड आदी जिल्ह्यांमधून वाशिममध्ये येणारी वाहने शहरातील हिंगोली नाका, पुसद नाका, पोष्टआॅफीस चौक, अकोला नाका आदी ठिकाणे ओलांडूनच समोर जातात. विशेष गंभीर बाब म्हणजे शहरांतर्गत वाहतूकही याच मुख्य मार्गावरून होते. यामुळे विस्कळितपणा वाढण्यासोबतच छोटे-मोठे अपघातही नियंत्रणाबाहेर गेले आहेत. यावर प्रभावी पर्याय म्हणून ‘रिंग रोड’चे काम विनाविलंब मार्गी लावणे आवश्यक ठरत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ‘रिंग रोड’च्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. ती विहित मुदतीत पार पाडण्यात आली. पुढचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करायचे आहे. - राजेंद्र लुंगेउपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिम