शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे रेंगाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 14:40 IST

वाशिम : ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेने निविदा प्रक्रियेत करून ठेवलेल्या घोळामुळे बहुतांश कामे पुढील मंजूरीअभावी रेंगाळली आहेत.

निविदा प्रक्रिया अडचणीत : १७ कामांचा प्रश्न ‘जैसे थे’लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेने निविदा प्रक्रियेत करून ठेवलेल्या घोळामुळे बहुतांश कामे पुढील मंजूरीअभावी रेंगाळली आहेत.प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १७ ठिकाणच्या रस्त्यांची कामे मंजूर आहेत. त्यामुळे प्रत्येक कामाची एक याप्रमाणे १७ निविदा काढून त्या मंजूर करणे आणि त्यानुसार कंत्राटदारांना कामे देवून ती पूर्ण करून घेणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १७ कामांची विभागणी सोयिस्करपणे १३ निविदांमध्ये करून छोट्या कंत्राटदारांना वगळण्यासोबतच पात्रता नसलेल्या काही कंत्राटदारांच्या निविदा मंजूर केल्या. हा गंभीर प्रकार जिव्हारी लागल्याने यासंदर्भात काही कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेवून न्यायाची मागणी केली. यादरम्यान ८ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आणि त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. चुकीच्या पद्धतीने कामकाज करणाºया मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाºयांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी लावून धरली. मात्र, यासंदर्भातील कामांची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याने कामे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही.

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूक