शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती ते चिखली चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 13:16 IST

अकोला : आयएल अ‍ॅण्ड एफ एस कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे बांधकाम रखडलेले आहे. रखडलेले बांधकाम पुन्हा तातडीने सुरू करण्यासाठी सरकारच्या हालचाली जोरात आहेत.

अकोला : आयएल अ‍ॅण्ड एफ एस कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे बांधकाम रखडलेले आहे. रखडलेले बांधकाम पुन्हा तातडीने सुरू करण्यासाठी सरकारच्या हालचाली जोरात आहेत. कंपनीसोबत वेगवेगळ्या स्तरावर वाटाघाटी झाल्या असून, हा प्रकल्प लवकर सुरू केल्या जात असल्याचे संकेत आहेत.अमरावती ते चिखली चौपदरीकरणाचे काम आयएल अ‍ॅण्ड एफ एस कंपनीकडे होते. या कामासोबतच देशातील अनेक मार्ग बांधकामांचे कंत्राट या कंपनीकडे आहे. कंपनी आर्थिक संकटात सापडल्यामुळे कंपनीने देशभरातील सर्व बांधकाम थांबवून आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे विकसित होत असलेले सर्व प्रकल्प अर्ध्यांवरच थांबले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीमध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचे आणि एलआयसीचे शेअर असल्याने अनेक कंपन्या अडचणीत आल्या आहेत. रखडलेल्या प्रकल्पामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने आता सरकारने दबाव आणून रखडलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. कंपनीवर दबाव आल्याने कंपनीने सरकारसोबत काही तडजोड स्वीकारली असून, काही महत्त्वाचा भाग कंपनीने विक्रीला काढल्याचे समजते. यासोबतच राज्य शासनाने रखडलेले प्रकल्प आहे त्या स्थितीत हातात घेण्याची तयारी दर्शविली आहे. या दोन्ही प्रस्तावास कंपनीने संमती दिली असल्याने रखडलेले प्रकल्प सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. कंपनीच्या संचालक आणि सरकारच्या बैठका वाढल्या असून, त्यामध्ये काही महत्त्वाचे करारही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी २६ डिसेंबरच्या बैठकीत या प्रकल्पास पूर्णरूप दिले जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. 

वरिष्ठ स्तरावर यासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत; मात्र अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. विविध प्रकल्पांसंदर्भात २६ डिसेंबर रोजी कें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला मीदेखील जाणार आहे. त्यामुळे याप्रकरणी २६ माहिती मिळण्याची शक्यता आहे.-विलास ब्राह्मणकर, प्रकल्प प्रमुख, चौपदरी महामार्ग विभाग अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाNational Highwayराष्ट्रीय महामार्ग