शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:54 IST

मी वाशिमकर गृपच्यावतिने कैद्यांना १५ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राख्या बांधण्यात आल्यात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  समाजात सर्वच गुन्हेगार नसतात, काहींना परिस्थितीही जेलात पाठविते अशांना राखी पोर्णिमेच्या दिवशी बहिणीची आठवण झाल्यानंतर त्यांनाही कोणी राखी बांधण्यास यावे अशी अपेक्षा असतेच. याच उद्देशाने वाशिमच्या वाशिमकर गृपच्यावतिने कैद्यांना १५ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राख्या बांधण्यात आल्यात. यावेळी अनेक कैद्यांचे डोळे पानवले होते. काहींनी 'ताई आमच्याकडे तुला दयायला काही नाही' असे म्हणून साश्रुनयनांनी आभार व्यक्त केलेत.मी वाशिमकर गृपमधिल महिला सदस्यांनी कैदयांना राख्या बांधण्यासंदर्भात कारागृह अधिक्षक यांच्याकडे  विचार मांडला. त्यांनी सुध्दा सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देत कैदयांना राख्या बांधण्याची परवानगी दिली. कैदयांना राख्या बांधल्या असता कैदयांना आपल्या बहिणीची आठवण आल्याचे त्यांच्या चेहºयावरुन दिसून येत होते. यावेळी कारागृहातील अधिक्षकांसह कर्मचाºयांची उपस्थिती लाभली होती.बहिण-भावाच्या अतुट नात्याची विण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या आनंददायी सणाचा कैद्यांनाही आनंद लुटता यावा. या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मी वाशिमकर गृपच्या सदस्या कैदयांना राखी बांधण्यासाठी गेले असता अनेक कैदयांना अश्रू आवरता आल्या नसल्याचे दिसून आले.   यावेळी सर्व  कैद्यांना राखीची भेट म्हणुन आपण केलेल्या चुका पुन्हा करू नका हीच आमच्यासाठी अमुल्य भेट राहील असे महिलांनी त्यांनी सांगितले. यावेळी कारागृह अधिक्षक  सोमनाथ पाडुळे यांचेसह कारागृहातील कर्मचाºयांनासुध्दा राखी बांधण्यात आली.मी वाशिमकर गृपच्यावतिने कारागृहात राबविण्यात आलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम स्तुत्य असून समाजाला आज अशा कार्यक्रमांची गरज आहे. कारागृहातील कैदयांना येथे येवून कैदयांना राख्या बांधल्याने त्यांच्यामध्ये एक चांगली भावना निर्माण झाली. कारागृहामध्ये आम्ही असे उपक्रम नेहमी घेतो. हा कार्यक्रम खरोखर कौतूकास्पद असल्याचे जिल्हा कारागृह अधिक्षक पाडुळे यांनी म्हटले.रक्षाबंधनाचा कार्यक्रमाला सोनाली ठाकुर, करुणाताई कल्ले, उषा वानखड यांच्यासह मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :washimवाशिमRaksha Bandhanरक्षाबंधन