लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथे ६ फेब्रूवारीला घडलेल्या एका घटनेतील दोन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणि त्यानंतर कोर्टात नेण्याकरिता रिसोड फाट्यापर्यंत हात बांधून पायदळ फिरविण्यात आले. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी अंगिकारलेले हे धोरण नियमबाह्य असल्याचा मुद्दा समोर करत काही महिलांनी त्याविरोधात २२ फेब्रूवारीला स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये साखळी उपोषण पुकारले आहे.प्राप्त माहितीनुसार, ६ फेब्रूवारीला रोजी घडलेल्या घटनेत संतोष गाभणे, संतोष गाभणे व विलास गाभणे या तिघांना मारहाण केल्याप्रकरणी विशाल अंभोरे, महादेव अंभोरे यांच्यासह अन्य ५ ते ७ जणांविरूद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी महादेव अंभोरे, विशाल अंभोरे व अन्य एकास पोलिसांनी २० फेब्रूवारीला सार्शी (ता.मंगरूळपीर) येथून अटक केली. संबंधितांची २१ फेब्रूवारीला वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि तेथून त्यांना मालेगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, पोलिस स्टेशनपासून पोलिसांनी महादेव व विशाल अंभोरे याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलास हात बांधून पायदळ फिरविले. यामुळे संतापलेल्या आरोपींच्या नातेवाईक महिलांनी पोलिस निरीक्षकांना याबाबत जाब विचारला. तसेच २२ फेब्रूवारीला पोलिस स्टेशनच्या आवारातच अन्य महिलांसोबत साखळी उपोषण अंगिकारले.
शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये महिलांचे साखळी उपोषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:00 IST