मानोरा : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तीन महिलांचा सत्कार लायनेस क्लबच्यावतीने करण्यात आला.राहूल पार्क येथे स्वाती देशमुख यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे मासीक सभेचे आयोजन करण्यात आले होते.सतत ३० वर्षापासुनी धुनी, भांडी, स्वयंपाक , करणाऱ्या प्रामाणिक व हसतमुख सुमनबाई शिंदे, पतीच्या निधनानंतर आपल्या मुलीला सुसंस्कार देवुन स्वावलंबी बनविणाऱ्या सुनंदाताई इंझाळकर आणि स्वत: दिव्यांग असुनही पितृछत्र हरविल्यानंतर कठीण परिस्थितीत नोकरी करुन घराचा गाढा ओढणाऱ्या वैशाली देशमुख या तीन महिलांचा सत्कार लॉयनेस क्लबच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला लॉयनेस क्लबच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा तारा महिंद्रे, सचिव सुधा खुपसे, सदस्या उपस्थित होत्या. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
महिला कामगारांचा सत्कार
By admin | Updated: May 7, 2017 13:31 IST