शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:37 IST

रिसोड : शासकीय रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला.

ठळक मुद्दे रफिया बी या महिलेस त्यांच्या नातेवाईकांनी दुपारी १२ वाजता रिसोड ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीकरिता आणले होते. येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वाशिम येथे जाण्याचा सल्ला दिला.या रूग्णवाहिकेद्वारे वाशिमला घेऊन जाण्यासाठी निघाले असता काही अंतरावरच महिलेची प्रसूती झाली.

रिसोड : शासकीय रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला.रिसोड येथील मोमिनपुरा भागातील रफिया बी या महिलेस त्यांच्या नातेवाईकांनी दुपारी १२ वाजता रिसोड ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीकरिता आणले होते. येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वाशिम येथे जाण्याचा सल्ला दिला.  याकरिता नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाºयांना रूग्णवाहिकेची मागणी केली. गाडीचे काम सुरू आहे, असे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. दुपारी तीन वाजेपर्यंत रूग्णवाहिकेचा बंदोबस्त झाला नव्हता. मात्र ३ वाजता रूग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर, सदर महिलेला नातेवाईकांसोबत या रूग्णवाहिकेद्वारे वाशिमला घेऊन जाण्यासाठी निघाले असता काही अंतरावरच महिलेची प्रसूती झाली. सदर रूग्णवाहिका परत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आली. परत आल्यानंतर रुग्णालयात कोणताही कर्मचारी किंवा नर्स उपस्थित नव्हते. वैद्यकीय अधिकाºयाने बाहेरच त्या महिलेस बघितले व तिथून निघून गेले. रुग्णालयात फक्त एक परिचारिका उपस्थित होती. तीदेखील दुसºया एका महिलेची प्रसुती करीत होती, असे रूग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. रुग्णालयातील एका सफाई कर्मचाºयाने या महिलेस घेऊन वार्डमध्ये शिफ्ट केले, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या रूग्णवाहिकेच्या चालकाने धावपळ करत दुसºया एका परिचारिकेला बोलावून घेतले व पुढील काम बघितले.यासंदर्भात रुग्ण महिलेचा भाऊ रज्जाक बेग म्हणाला की, मंगळवारी दुपारी मी माझ्या बहिणीला इतर नातेवाईकांसोबत घेऊन प्रसूतीकरिता ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील  वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाºयांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही व आम्हास खूपच त्रास सहन करावा लागला. मात्र रूग्णवाहिकेच्या चालकाने आम्हाला चांगले सहकार्य केले, असे रज्जाक यांनी सांगितले. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नसल्याने संपर्क झाला नाही.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड