पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फुलउमरी येथे तुळसीबाई मधुकर चव्हाण ह्या गेल्या तीन चार वर्षापासून एकट्याच राहत होत्या. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती दिग्रस येथून दवाखान्यात उपचार करून आल्याचे कळते . गेल्या तीन चार दिवस अगोदर प्रकाश उदेसिंग राठोड यांच्या शेतातील विहिरीत पडल्याची चर्चा आहे. १९ एप्रिलला तुळसाबाई चव्हाण यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मानोरा पोलिसांना कळताच प्रभारी ठाणेदार गजानन धंदरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत महिलेचे पती मधुकर पंडित चव्हाण यांनी मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. शवविच्छेदनकरिता मृतदेह मानोरा येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास मानोरा पोलीस करीत आहे.
महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST