लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील रिसोड मार्गावर असलेल्या लाखाळा परिसरात अज्ञात वाहनाने ६० वर्षीय वृध्द महिलेस धडक दिली. या धडकेत महिलेचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. ही घटना ६ जुन रोजी सकाळी ११ वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार इंदूबाई शेषराव सोनुने (रा. फाळेगाव ह.मु. वाशिम) या लाखाळा परिसरात कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेमध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरज डोंगरे यांनी फिर्याद नोंदविली. पोलीसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करीत आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार
By admin | Updated: June 7, 2017 01:41 IST