शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरातच रस्त्यावरील खड्डे जैसे-थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:51 IST

राजुरा (वाशिम): तालुक्यातील रिधोरा-खैरखेडा रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्यावतीने करण्यात आली. या कामात नियमांना बगल देण्यात आल्याने अवघ्या आठवडाभरातच या मार्गावरील खड्डे जैसे-थे झाल्याने कंत्राटदाराच्या दिरंगाईचे पितळ उघडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (वाशिम): तालुक्यातील रिधोरा-खैरखेडा रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्यावतीने करण्यात आली. या कामात नियमांना बगल देण्यात आल्याने अवघ्या आठवडाभरातच या मार्गावरील खड्डे जैसे-थे झाल्याने कंत्राटदाराच्या दिरंगाईचे पितळ उघडे पडले आहे. आता या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी खैरखेड्याच्या सरपंच आशा शेळके यांनी २६ मार्च रोजी केली आहे. सरपंच आशा शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार रिधोरा-राजुरा-खैरखेडा या डांबरी रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविण्यासाठी चालकांना कसरतच करावी लागत असल्याने अपघाताची भिती निर्माण झाली होती. या रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून तालुक्यातील एका कंत्राटदाराला रस्ता दुरुस्तीचे काम देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवातही झाली; परंतु या कामांत नियमांना बगल देण्यात आली. त्यामुळे हे काम निकृष्ठ झाले असून, या रस्त्यावर पूर्वी बुजविण्यात आलेले खड्डे  आठवडाभरातच जैसे-थे झाले आहेत. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप सरपंच आशा शेळके यांनी केला असून, या कामाची तातडीने चौकशी करून पुन्हा रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

रिधोरा-खैरखेडा रस्ता दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कामात नियमांना पूर्णपणे बगल देण्यात आली आहे. त्यामुळे बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा जैसे-थे झाले असून, या कामाची चौकशी करणे आवश्यक आहे.-आशाबाई शेळके, सरपंच,खैरखेडा.

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग