शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

टस्सल होणार की एकतर्फी ठरणार? उद्या निकाल, निवडणूक निकालाबाबतची उत्कंठा संपणार

By संतोष वानखडे | Updated: June 3, 2024 19:48 IST

जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा तर वाशिम व कारंजा विधानसभा मतदारसंघ हा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

संतोष वानखडे

वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांत टस्सल लढत झाली की मतदारांनी एकतर्फी कौल दिला, याचा फैसला ४ जून रोजी मतमोजणीतून होणार आहे.

जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा तर वाशिम व कारंजा विधानसभा मतदारसंघ हा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे, काॅंग्रेसचे डाॅ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या तिरंगी लढत झाली तर लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम  मतदारसंघात उद्धवसेनेचे संजय देशमुख व शिंदेसेनेच्या राजश्री पाटील यांच्यात थेट लढत झाली.

या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदान झाल्यापासून कोण जिंकणार व कोण हरणार, यावरून एका महिन्यापासून केवळ आकडेमोड सुरू होती. आपलाच उमेदवार विजयी होणार, गुलाल आम्हीच उधळणार असे दावे, प्रतिदावे करण्यात आले. निवडणूक टस्सल झाली की एकतर्फी झाली, खासदार कोण होणार? याबाबत असलेली उत्सुकता ४ जून रोजी संपणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाची मोजणी अकोला येथे तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची मोजणी यवतमाळ येथे सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.विधानसभा मतदारसंघनिहाय असे झाले होते मतदान

मतदारसंघाचे नाव / एकूण मतदार / मतदान / टक्केवारीवाशिम / ३५६५७२ / २१५९४८ / ६०.५६कारंजा / ३०६७३६ / १८७०४२ / ६०.९८राळेगाव / २८१२६६ / १९३९७३ / ६८.९६यवतमाळ / ३५७३५३ / २१२४८४ / ५९.४६दिग्रस / ३३०२९७ / २२०००६ / ६६.६१पुसद / ३०८६९२ / १९०७३६ / ६१.७९ 

कोणकोणत्या नेत्यांच्या झाल्या सभा?

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा तर सिनेअभिनेते गोविंदा यांचा रोड शो झाला. महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहिर होण्यापूर्वी चार सभा घेतल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरतेवेळी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचारात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांनीच प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळली होती.