शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

किडनी देऊन पत्नीने दिले पतीला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 13:42 IST

शिरपूर येथील दिपिका आणि संदीप काळे असे या दाम्पत्याचे नाव असून, सध्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे.

- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : दोन्ही किडण्या निकामी झाल्याने गत वर्षभरापासून मृत्यूशी झूंज देणाऱ्या पतीला अर्थांगिनीने २६ फेब्रुवारीला किडनी देत जीवनदान दिले आहे. शिरपूर येथील दिपिका आणि संदीप काळे असे या दाम्पत्याचे नाव असून, सध्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे.शिरपूर येथील संदीप काळे हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत काम करीत होता. वर्षभरापासून त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. वर्षभरापासून त्याचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू होता. किमान एक किडनी प्रत्यारोपण केल्याशिवाय जीवन जगणे कठीण असल्याचे पुणे येथील एका खासगी रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. संदीप याला जीवनदान देण्यासाठी सुरूवातीला त्यांच्या सासू बेबीताई भालेराव या किडनी देण्यास तयार होत्या. मात्र किडनी देण्याअगोदर त्यांचा रक्तदाब जास्त प्रमाणात कमी-जास्त होत असल्याच्या कारणास्तव जावयाला किडनी देणे त्यांना शक्य झाले नाही. परिणामी खर्च वाढून वेळही वाया गेला. अशावेळी भालेराव व काळे कुटुंबासमोरील पेच अधिकच वाढला. त्यातच संदीपची प्रकृती खालावत चालल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने दोन्ही कुटुंब चिंताग्रस्त झाले होते. ३२ वर्षीय पत्नी दीपिका, ८ वर्षीय मुलगा प्रथमेश, ५ वर्षीय मुलगी स्वरा यांचे जीवन अंधकारमय होण्याची चिन्हे दिसू लागली. अशावेळी दीपिकाने पतीला एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. पूणे येथील खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही विलंब न करता दिपीकाच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या आणि दीपिकाची किडनी संदीपशी जूळत असल्याचे सांगितले. २६ फेब्रुवारी रोजी तज्ञ डॉक्टरांनी दीपिकाची एक किडनी काढून संदीपला जीवनदान दिले. किडनी प्रत्यारोपणनंतर संदीप व दीपिकाची प्रकृती ठणठणीत असून कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

टॅग्स :washimवाशिम