शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

१५ व्या वित्त आयोगातील खर्चात दिरंगाई कशासाठी?

By संतोष वानखडे | Updated: July 11, 2024 17:49 IST

प्रकल्प संचालकानी ५० ग्रामसेवकांना खडसावले: दालनात सुनावणी

संतोष वानखडे, वाशिम: पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा खर्च शंभर टक्के करण्याचे निर्देश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी गत महिन्यात दिल्यानंतरही जिलह्यातील ५० ग्रामपंचायतींनी दिरंगाई करीत ७० टक्क्यांपेक्षा कमी खर्च केला. या प्रकरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी १० जुलै रोजी सर्व संबंधित ग्रामसेवकांना खडसावत खर्चात दिरंगाई का, असा प्रश्न केला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी मागील महिन्यामध्ये जिल्ह्यातील सर्व विकास अधिकारी (डी.ओ.) यांनी मॅरेथॉन आढावा सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या खर्चामध्ये उदासिनता खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. तसेच ७० टक्के पेक्षा कमी खर्च झालेल्या ग्रामपंचायतींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी सहा तालुक्यामधील कमी खर्च असलेल्या ग्रामसेवकांना बोलावून त्यांची कान उघडणी केली. जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील ३० टक्क्यांपेक्षा कमी खर्च असलेल्या तब्बल ५० ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना आपल्या दालनात बोलावून त्यांची सुनावणी घेतली. यात ७० टक्क्यांपेक्षा कमी खर्च का अशी विचारणा करुन त्यांना कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. कमी खर्च होण्याची कारणे जाणुन घेऊन १५ व्या वित्त आयोगामध्ये शंभर टक्के खर्च करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिम