संतोष वानखडे / वाशिमविद्यार्थ्यांना दज्रेदार शिक्षण देण्याच्या नावाखाली इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांनी बारावी, पदवीधारकांच्या हाती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सोपविल्याची बाब समोर येत आहे. सन २0१६-१७ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासण्याची मागणी झाल्याने सदर पात्रता तपासण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.शैक्षणिक क्रांती झाल्याने ग्रामीण भागातील पालकदेखील शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी धडपडत असतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे सर्वांचाच कल वाढल्याने साहजिकच शैक्षणिक संस्थांचे पीकही जोमाने बहरले आहे. पालकांचा वाढलेला कल ह्यकॅशह्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. वाशिम जिल्हय़ात इंग्रजी माध्यमाच्या जवळपास ६४ खासगी शाळा आहेत. यापैकी जवळपास ४६ शाळा आरटीईच्या (राइट टू एज्युकेशन) कक्षेत येतात. काही नामांकित खासगी शाळांचा अपवाद वगळता उर्वरित शाळेत बारावी, पदवीधारक उमेदवारही विद्यार्थ्यांना शिकवित असल्याची परिस्थिती आहे. शासन निर्देशानुसार शिक्षणशास्त्र पदविका किंवा पदवीधर अर्थात डी.टी.एड. किंवा बी.एड.धारक उमेदवारच शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा देऊ शकतो; मात्र या नियमाला धाब्यावर बसवून, अनेकांनी बारावी, पदवीधारक उमेदवारांना शिक्षक म्हणून नेमले असल्याचा प्रकार समोर येत आहे. सन २0१६-१७ या शैक्षणिक सत्रात या प्रकाराला आळा घालण्याची मागणी रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी केली. त्या अनुषंगाने जिल्हय़ातील कॉन्व्हेंटमधील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासली जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
शिक्षकांच्या पात्रतेची पडताळणी कधी?
By admin | Updated: March 18, 2016 02:06 IST