शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील शेतकऱ्यांची गव्हाच्या पेऱ्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:54 IST

वाशिम: यंदा अमरावती विभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यातच सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेऱ्या कडे पाठच केली आहे. अमरावती विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली.

ठळक मुद्देविभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही.विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत आहे.केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे.

वाशिम: यंदा अमरावती विभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यातच सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेऱ्या कडे पाठच केली आहे. अमरावती विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली.अमरावती विभागात रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा आणि गहू या दोन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर होते. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५० टक्के अधिक क्षेत्रावर हरभरा, तर ३० टक्के क्षेत्रावर गहू या पिकाची पेरणी अमरावती विभागात होते. रब्बी हंगामातील सूर्यफुल आणि करडई या पिकांची पेरणी आता परवडणारी नसल्याने शेतकºयांनी या पिकांकडे गेल्या काही वर्षांपासून पाठ केल्यानंतर गहू पिकाचे क्षेत्र वाढले होेते; परंतु यंदा विभागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यातच प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केल्याने शेतकरी गहू पिक पेरण्याची जोखीम पत्करूच शकले नाहीत. प्रकल्प आटले असतानाच भूगर्भातील जलपातळी कमालीची खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. गहू या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे विहिरीतील पाणी या पिकाला पुरण्याचा विश्वास शेतकºयांना राहिला नाही. परिणामी या पिकाच्या पेºयाकडे शेतकºयांनी पाठ केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ५३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत होती; परंतु या जिल्ह्यात केवळ २० हजार ४२० हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे. अकोल्यात सरासरी २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ४१६० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात सरासरी २०१०० हेक्टरपैकी ६१३०, अमरावती जिल्ह्यात सरासरी ४६ हजार ३०० हेक्टरपैकी १८३६०, तर यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ३५ हजार १०० हेक्टरपैकी केवळ ६१३० हेक्टरवर गहू पिकाची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामात यंदा एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावरही पेरणी झाली नसून, आता गव्हाच्या पेरणीला काही दिवस उरले असले तरी, पाण्याअभावी क्षेत्र वाढण्याची मुळीच शक्यता राहिली नसल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती