शिरपूर जैन (वाशिम): शेगावहून रिसोडकडे परतीचा प्रवास करणार्या संत गजानन महाराज संस्थान रिसोड येथील पायदळ दिंडीचे शिरपूर येथे भावपूर्ण स्वागत करण्यात आले.दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रिसोड येथील संत गजानन महाराज संस्थान रिसोड येथून गोविंद बगडीया यांच्या मार्गदर्शनात १३ नोव्हेंबर रोजी शेगाव कडै प्रस्थान केले होते. पायदळ दिंडी मेहकर, जानेफळ, खामगाव मार्गे शेगावला पोहचली होती. तेथील मुक्काम अटोपून दिंडी बाळापूर, पातुर, मेडशी, डव्हा, मार्गे जय गजाननच्या घोष करित २२ नोव्हेंबर रोजी शिरपूर दाखल झाली. दिंडी स्थानिक जानगीर महाराज संस्थानवर देण्यात आली. त्यानंतर दिंडी दुपारच्या भोजनासाठी विलास वाघमारे यांच्या निवासस्थानी आली असता वाघमारे कुटूंबीयासह गावातील शेकडो गजानन भक्तांनी आरती पूजन करुन दर्शन घेतले.
शेगाव मार्गस्थ दिंडीचे शिरपूरात स्वागत
By admin | Updated: November 23, 2014 00:12 IST