शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक दुकानांमधील वजनमापांची तपासणी कागदोपत्रीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 15:52 IST

दुकानांमधील वजनमापांची तपासणी कागदोपत्रीच उरकली जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : व्यापारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये असलेले साधे वजनकाटे, इलेक्ट्रीक वजनकाट्यांची वेळोवेळी तपासणी करणे, अधिकृत वजनकाट्यांना प्रमाणित करून त्यावर मुद्रांकन करण्याची जबाबदारी असलेल्या वैधमापन शास्त्र विभागाचे कामकाज सद्या पुरते ढेपाळले असून दुकानांमधील वजनमापांची तपासणी कागदोपत्रीच उरकली जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वजन माप विषयक अधिनियम व नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून वैधमापन शास्त्र विभाग ओळखला जातो. या विभागांतर्गत जिल्हास्तरीय निरीक्षक विभागाच्या कार्यालयाकडून व्यापारपेठेतील व्यावसायिक दुकानांमध्ये असलेल्या वजन व मापांची पडताळणी केली जाते व त्या वजन मापांवर मुद्रांकन केले जाते. असे असले तरी वाशिमसह अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार आलबेल झाला आहे. वाशिममध्ये तर एका छोट्याश्या भाड्याच्या खोलीत गेल्या कित्येक वर्षांपासून या विभागाचे कामकाज सुरू आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे या कार्यालयाला अद्याप स्वतंत्र विद्यूत मीटर नसल्याने शेजारच्या एका इसमाकडून ठराविक रक्कम देवून वीज घेतली जाते. व्यापारपेठेतील व्यावसायिक दुकानांमध्ये योग्य त्या सर्व बाबींची तपासणी न करताच वजनकाट्यांचे ‘पासींग’ केले जाते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार राजरोसपणे सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वैधमापन शास्त्र विभागांतर्गत व्यावसायिक दुकानांमधील वजनमापांची नियमित तपासणी केली जाते. नियमानुसार सर्व बाबींची पडताळणी करूनच वजनकाटे ‘पास’ केले जातात. यासंबंधी ग्राहकांची कुठलीही तक्रार असल्यास ते विभागाकडे करू शकतात, त्याचीही दखल घेतली जाईल.- बी.बी. गायकवाडनिरीक्षक, वैधमापन शास्त्र विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार