शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरीमुळे भारनियमनाचा फटका

By admin | Updated: June 17, 2014 23:49 IST

जादा प्रमाणात होणार्‍या वीजभारनियमनाची झळ शेलुबाजारसह परिसरातील १४ गावातील वीजग्राहकांना सोसावी लागत आहे.

मंगरुळपीर : ग्राहकांनी वीज देयके वेळेवर अदा करावीत म्हणून विविध फिडरवर भारनियमनात सवलती दिल्या आहेत.त्यात शेलूबाजार फिडरला वीज चोरीमुळे एफ ग्रुपचा वीज पुरवठा केला जात आहे.त्यामुळे जादा प्रमाणात होणार्‍या वीजभारनियमनाची झळ शेलुबाजारसह परिसरातील १४ गावातील वीजग्राहकांना सोसावी लागत आहे.तालुक्यातील शेलूबाजार ३३ के.व्ही सब स्टेशनवरून तर्‍हाळा-१३,कंझरा-२ व शेलूबाजार फिडरवरून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच वनोजा पाणी पुरवठा योजनेकरिता एक्सप्रेस फिडर आहे तर कृषी पंपाकरिता स्वतंत्र फिडर देण्यात आलेले आहे.घरगुती वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्याकरिता गावठाण फिडरची निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे कृषी पंप व गावठाण फिडरच्या भारनियमनाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.परंतु, कृषी पंपाच्या वीजपुरवठयाकडे महावितरण कार्यालयाचे साफ दुर्लक्ष असल्याने शेतकर्‍यांना भारनियमनाच्या वेळे व्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने कृषीपंपधारक शेतकरी दोन्ही वाहिनीच्या क्रॉसिंगच्या ठिकाणी गावठाण फिडरच्या वाहिनीवरून कृषी पंपाकरिता अवैध वीजजोडणी करून ओलीत करतात.त्यामुळे गावठाण फिडरवरून कृषी पंपांकरिता मोठय़ा प्रमाणावर वीजचोरी होत असल्यामुळे वीजगळती जास्त प्रमाणात असल्याच्या कारणावरुन घरगुती जोडणीधारक मोठय़ा प्रमाणात भारनियमनाची झळ बसत आहे कृषी वाहिनीकडे महावितरण कार्यालयाने विशेष लक्ष दिल्यास ही समस्या मार्गी लागूृ शकते.त्यामुळे शेलूबाजार फिडरचे रॅकींग वसुलीच्या जोरावर एफवरून सी ग्रुपमध्ये येऊ शकते.तसे झाल्यास अतिरिक्त वीजभारनियमनातून ग्राहकांची सुटका होऊ शकते. कंझरा फिडर वर दोनच गावाचा लोड आहे या फिडरवर वरून गोगरी,हिरंगी,खेर्डा बु,खेर्डा खु अशी चार गावे जोडुन दिल्यास शेलूबाजार फिडरवरील गावाचा ताण कमी होऊ शकतो. मात्र हे करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे.यासंबंधात महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.