शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या खचलेल्या कडांमुळे अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 19:05 IST

मंगरुळपीर तालुक्यातील काही पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भिती असल्याने हे पूल दुरुस्त करणे आवश्यक आहे.

वाशिम, दि. 25 - मंगरुळपीर तालुक्यातील काही पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भिती असल्याने हे पूल दुरुस्त करणे आवश्यक आहे. शहरालगत असलेल्या मानोरा मार्गावरील अरुणावती नदीच्या पुलाचे कठडे पूर्णपणे खचल्यामुळे येथून वाहनधारकांना काळजीपूर्वकच वाहन चालवावे लागत असल्याचे पाहायला मिळते. याची बांधकाम विभागाने दखल घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मंगरुळपीर शहराच्या बाहेरून अरू णावती ही नदी वाहते.  शहरातून जाणाºया मानोरा मार्गावर या नदीवर वाहतुकीसाठी अनेक वर्षांपूर्वी एक पूल बांधण्यात आला आहे. सद्यस्थितीत या पुलाची अवस्था गंभीर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या कडा खचल्या असून, भिंतीही जीर्ण झाल्या आहेत. या पुलाची उंचीही खूप कमी आहे. एखाद वेळी नदीला पूर आल्यास पुलावरून फुट, दोन फूट पाणी वाहते. अशात पुल दिसतही नाही. त्यामुळे वाहनधारकांनी पुलावरून पाणी वाहत असताना वाहन नेण्याचा प्रयत्न केल्यास अपघात घडण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यातच पुलाची रुंदी कमी असल्याने वाहनांची वर्दळ वाढून एकाच वेळी दोन तीन वाहने पुलावर आल्यास मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एखादे वाहन पुलावरून खाली कोसळून मोठा अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून हीच स्थिती असतानाही बांधकाम विभागाच्यावतीने या पुलाची उंची वाढविणेच काय, तर पुलास कठडे बसविण्याची तसदीही घेतली नाही.