शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी दुरुस्तीनंतरही पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 14:59 IST

शिरपूर जैन : अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करुन संबधितांचे लक्ष वेधल्याने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. परंतु करण्यात आलेल्या थातूर-मातूर कामामुळे आजही लाखो लिटर पाण्याचा अपव्यय बेलखेडनजिक वॉलच्या गळतीवरुन दिसून येते. बेलखेडजवळील वॉलमधून मोठया प्रमाणात फवारे उडून पाण्याचा पाट वाहतांना दिसून येत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. गत दहा दिवसांपाूवी पार्डी तिखे येथे लिकेज झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत असतांना याकडे कुणाचेही लक्ष नव्हते.  यासंदर्भात लोकमतने ५ जानेवारी रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच या कामास सुरुवात करण्यात आली. हे काम करतांना परिसरात अधिक कुठे लिकेज आहे का, वॉल नादुरुस्त आहेत का याची पाहणी करण्यात न आल्याने आजही लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतांना दिसून येत आहे. एकीकडे पाणी टंचाई व दुसरीकडे होत असलेल्या या पाण्याच्या अपव्ययाबद्दल नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी रिसोड नगरपरिषदेची स्वतंत्र पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन अनेकदा लिकेज होत आहे परंतु वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी रिसोड नगरपरिषदची पाईप लाईन अनेकदा लिकीज  झाल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता. यासंदर्भात लोेकमतने वेळोवेळी पाठपुरावा करुन संबधितांचे लक्ष वेधून त्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतु योग्य देखरेख व नियोजनाअभावी वारंवार जलवाहिनी, वॉल लिकेज होवून पाण्याचा अपव्यय होतांना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून कायमस्वरुपी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड