शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यातील २८ गावे पाणी पुरवठा योजना १० दिवसापासुन बंदच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:08 IST

मानोरा : मानोरा शहरासह तालुक्यातील २८ गावांना पाणी पुरवठा करणारी २८ गावे प्रादेशीक योजना भुली फाटट्यावर लिंकेज असल्यामुळे उर्वरीत गावासाठी गेल्या १० दिवसापासुन बंदच आहे.

ठळक मुद्देमानोरा शहरासह तालुक्यासाठी वरदान ठरलेली २८ गावे पाणी पुरवठा योजना गेल्या १० दिवसापासुन बंद आहे. योजना या ना त्या कारणाने नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव दुषीत पाण्याचा सामना करावा लागत आहे.

 मानोरा : मानोरा शहरासह तालुक्यातील २८ गावांना पाणी पुरवठा करणारी २८ गावे प्रादेशीक योजना भुली फाटट्यावर लिंकेज असल्यामुळे उर्वरीत गावासाठी गेल्या १० दिवसापासुन बंदच आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल बेहाल होत आहे. योजना पुर्ववत करण्यासाठी प्राधीकरणाचे प्रयत्न कासवगतीने सुरु आहे.मानोरा शहरासह तालुक्यासाठी वरदान ठरलेली २८ गावे पाणी पुरवठा योजना गेल्या १० दिवसापासुन बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने विहीरीला नव्या पाण्याची सुरुवात झाली आहे. आलेले नवे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. प्रादेशीक योजना या ना त्या कारणाने नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव दुषीत पाण्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आजार बळावत आहे. तत्कालीन कर्मचारी गंगाधर ढोरे हे गत महिन्यात सेवानिवृत्त झाले, तेव्हापासुन या योजनेला कुणी वालीच राहिला नाही. असे दिसुन येत आहे. या संदर्भात शाखा अभियंता खराटे यांचेशी संपर्क साधला असता त्यांचे दोन्हीही नंबर बंद होते.

भुली फाट्यावर लिकेज असल्यामुळे ते पुर्ववत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. आजच ते काम पूर्ण होवुन उद्या ही योजना पुर्ववत करण्यात येईल. -गणेश भोगावडे, सहा.कार्यकारी अभियंता जिवन प्राधीकरण, कारंजा.

टॅग्स :ManoraमानोराWaterपाणी