शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना पुनरूज्जीवनाचा प्रश्न रेंगाळला!

By admin | Updated: February 7, 2017 03:08 IST

२५ गावांची पाण्यासाठी भटकंती : ३.८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर; मात्र कामे सुरू होण्याची प्रतीक्षा कायम.

सुनील काकडे वाशिम, दि. ६- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत उंबर्डाबाजार (ता. कारंजा) येथील नऊ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि म्हसणी (ता. मानोरा) येथील १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पुनरूज्जीवनासाठी ३.८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला; मात्र पुनरूज्जीवनाच्या एकाही कामास अद्याप प्रारंभ झाला नसून, २५ गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार आणि मानोरा तालुक्यातील म्हसनी येथील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरूज्जीवीत करण्यासाठी ३१ डिसेंबरला शासनाकडून ३.८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार ९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत अनेक वर्षांपासून बंद आहे. परिणामी, परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर योजना आजही बंदच असल्यामुळे दिघी, मनभा, दोनद बु., यावर्डी, येवता, वडगाव रंगे, सोमठाणा, जनुना पिंप्री आदी गावांनादेखील पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.मानोरा तालुक्यातील म्हसनी येथील १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्याने परिसरातील तोरनाळा, जामदरा, इंझोरी, वाघोडा, मोहगव्हाण, दापूरा, धानोरा भुसे, जनुना खुर्द, कुपटा, नायनी, रुद्राळा, उंबर्डा, चौसाळा, चोंडी, वापटा आदी गावांमधील पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. तथापि, कारंजा आणि मानोरा तालुक्यातील सदर दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने पुरेसा निधी मंजूर केला; मात्र तो अद्याप प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याने पुनरूज्जीवनाची कुठलीच कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने मध्यंतरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनाच्या ह्यटेंडर प्रोसेसिंगह्णचे काम थांबले; मात्र आता या कामांना निश्‍चितपणे गती मिळणार असून, उंबर्डाबाजार ९ गावे आणि म्हसणी १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनाची कामे मार्गी लागतील. यासह जिल्ह्यातील इतर ८ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनाचा प्रस्तावदेखील शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. - के. के. जीवनेकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वाशिम