शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर शहरातील वार्ड क्रमांक एकमधील पाणीपुरवठा अनियमित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 14:43 IST

मंगरूळपीर : शहरातील वार्ड क्रमांक एकमधील काही भागात नळाचे पाणी नियमित येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

नागरिकांची गैरसोय : आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : शहरातील वार्ड क्रमांक एकमधील काही भागात नळाचे पाणी नियमित येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नादुरूस्त असलेले व्हॉल्व बदलून नळपाणीपुरवठा योजना पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांनी शनिवारी नगर परिषद तसेच तहसिल कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली.मंगरूळपीर शहरातील मठ मोहल्ला आणि गवळीपुरा येथील रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मंगरुळपीर नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक एकमध्ये नगर परिषदेची नळ जोडणी असून, दरवर्षी नागरिकांकडुन पाणी कराचा भरणाही केला जातो. तरीही दोन वर्षापासून वार्ड क्रमांक एकमधील काही भागात पिण्याचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात संबंधित विभागाकडे तक्रारही करण्यात आली होती. परंतु कुठलीह उपाययोजना प्रशासनाकडुन करण्यात आली नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेणे शक्य नसून, वार्ड क्रमांक एकमधील त्या भागातील हातपंपही सुरु नाहीत. त्यामुळे दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. नियमित कर भरणा करुनही पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकउे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याकडे तहसिल प्रशासनाने लक्ष देऊन नगर परिषदेला सूचना द्यावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. पाणीपुरवठा पूर्ववत झाला नाही तर नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदनावर मोहम्मद भुरीवाले, रमजान नौरंगाबादी, इमाम भवानीवाले, मोहम्मद चौधरी,अकबर नंदावाले, मुक्तार पप्पुवाले, कालु भुरीवाले आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर