शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यातील २८ गावांचा पाणीपुरवठा महिनाभरापासून ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 18:27 IST

मानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथील अरूणावती प्रकल्पावरून सन १९९४-९५ मध्ये मानोरा तालुक्यातील मानोरा शहरासह २८ गावांकरिता प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची निर्मिती झाली. प्रत्यक्षात मात्र सुरूवातीपासूनच या ना त्या कारणांनी वांध्यात सापडलेल्या या योजनेच्या माध्यमातून २८ नव्हे; तर १४ ते १५ गावांनाच पाणीपुरवठा करण्यात आला. चालूवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी ही योजना पूर्णत: बंद पडली होती. मात्र, पाऊस झाल्यानंतर जून महिन्यापासून योजना पुर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत असताना गेल्या महिनाभरापासून नादुरूस्तीच्या नावाखाली नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांना विहिर, हातपंप, कुपनलिकांचे तुलनेने दुषित पाणी प्यावे लागत आहे. दुषित पाणी प्राशनाने ‘डायरिया’ची लागण!विहिर, हातपंप, कुपनलिकांच्या पाण्याचे नमुने घेवून जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाने विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने दुषित पाणी प्राशनामुळे अनेक नागरिकांना ‘डायरिया’ची लागण होत असून असे रुग्ण दैनंदिन मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार घेत आहेत. ही बाब लक्षात घेता तालुका प्रशासनाने तालुक्यातील सर्व ठिकाणच्या जलस्त्रोतांचे नमुने तपासून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे. मानोरा-२८ गावे पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळेच पाणीपुरवठा करणे बंद आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ संबंधित सर्व गावांना पाणीपुरवठा केला जाईल.- गजानन खराटेशाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा