शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या गावातही पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 16:01 IST

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाण्याची गरज पूर्ण झाल्याच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील तब्बल ४६९ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ ठरली आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाण्याची गरज पूर्ण झाल्याच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील तब्बल ४६९ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ ठरली आहेत. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या जवळपास १०० पेक्षा अधिक गावांत तिव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जाते. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने उपरोक्त ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या ४६९ गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. जिल्ह्यात एकूण ७९३ महसूली गावे असल्याने आणि कृषी विभागाच्या लेखी ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झालेली असल्याने उर्वरीत ३२४ गावांत पाणीटंचाई निर्माण होणे अपेक्षीत होते. मात्र, जिल्हा प्रशासनानेच जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई जाहिर करून कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यामुळे येथे नेमकी चुक कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झालेली असेल तर ५०० गावांत कोणत्या आधारावर पाणीटंचाई जाहिर करण्यात आली आणि ५०० गावांत खरोखरच पाणीटंचाई असेल तर ४६९ गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये कोणत्या आधारावर करण्यात आला, या दृष्टिने पडताळणी होणे आवश्यक ठरत आहे.

वॉटर न्यूट्रल यादीतील गावांचे फेरसर्वेक्षण झाल्यास वस्तुस्थिती येईल समोर !शेती प्रयोजनाकरिता लागणाºया पाण्यासह जनावरे, गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत जलसंधारणाची कामे केली जात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या तालुकास्तरीय समितीकडून सर्वेक्षण केले जाते. या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तर सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी असतात. त्या-त्या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी काढली जाते. १०० टक्केवारी असलेल्या गावाची पाण्याची गरज पूर्ण झाल्याची शहानिशा केली जाते. त्यानंतरच संबंधित गावाचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश केला जातो. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई असल्याने फेर सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अनेकवेळा केली. मात्र, अद्याप फेर सर्वेक्षण करण्यात आले नाही.

सन २०१५-१६ मध्ये २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. ही सर्व गावे वॉटर न्यूट्रल ठरली आहेत. सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जवळपास १४०० कामे पूर्ण झाली आहेत.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई