शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामासाठी तालुक्यांदरम्यान चढाओढ     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:27 IST

वाशिम: राज्य शासन व भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासन व भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत जलसंधारणाची कामे करुन गाव पाणीदार करण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. जिल्ह्यातील  १४ गावात १३ जेसीबी मशीनच्या आधारे शेततळे, नाला खोलीकरण, नदी खोलीकरण आदी कामे वेगात करण्यात येत आहेत.पाणीटंचाईची समस्या कायम हद्दपार करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) पुढाकार घेतला आहे. यानुसार बीजेएस आणि राज्यशासनादरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्यात सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात १८ गावांची जलसंधारणाच्या कामांसाठी प्राथमिक टप्प्यात निवड झाली असून, या गावांत प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे. कृषी विभाग, वनविभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि भूजल सर्वेक्षण व विकास संस्थेच्या सहकार्याने ही कामे करण्यात येत आहेत. यात १०० चौरस मीटर लांबी, रुंदी आणि ३ ते ४ मीटर खोल आकाराच्या भव्य शेततळ्यांसह नदी खोलीकरण, नाला खोलीकरण, तलावातील गाळ उपसा, खोल सलग समतल चर, तसेच इतर काही कामांचा समावेश आहे. तालुकास्तरावर तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकाºयांच्यावतीने या कामांचा वारंवार आढावा घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात बीजेएसने उपलब्ध केलेल्या २८ जेसीबी मशीनपैकी १३ मशीनच्या आधारे १४ गावांत वेगाने कामे करण्यात येत आहेत.वाशिम तालुका आघाडीवरसुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात पाच तालुक्यांत कामांना वेग आला असला तरी, सद्यस्थितीत वाशिम तालुका आघाडीवर असून, या तालुक्यातील धुमका, सोंडा, घोटा आणि वारला या चार गावांत कामे सुरू आहेत. त्या खालोखाल मंगरुळपीर तालुक्यात चांभई, पिंपळखुटा आणि मानोली या तीन गावांत, मानोºयात सोमनाथ नगर, पिंप्री हनुमानसह इतर एका गावांत आणि मालेगाव तालुक्यात जोडगव्हाण, चिवरा या दोन गावांत कामे सुरू आहेत.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा