शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:49 IST

वाशिम: वॉटर कप स्पर्धेंसाठी निवड झालेल्या मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ६० गावांत श्रमदानाच्या माध्यमातून जवळपास १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत

ठळक मुद्देमंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ११५ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले. दोन्ही तालुक्यातील ६० गावांत मिळून १ लाख घनमीटरच्या क्षेत्रात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.यामध्ये शेताची बांधबंदिस्ती, शेततळे, सीसीटी, माती नाला बांध, एलबीएस बंधारे, सीसीटीसह पाणलोट उपचारांच्या कामांचा समावेश आहे.

वाशिम: वॉटर कप स्पर्धेंसाठी निवड झालेल्या मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ६० गावांत श्रमदानाच्या माध्यमातून जवळपास १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. आपले गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ झपाटले असून, वॉटर हिरोंच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे हे शक्य होऊ शकले आहे. पाणी फांऊडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी यंदा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील ११५ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी मंगरुळपीर तालुक्यात ३५, तर कारंजा तालुक्यात ३० गावांनी श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली आहे. ७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून या कामांना सुरुवात झाली. स्पर्धेसाठी कामांचे घनमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, या गावांत निर्धारित उद्ष्टिानुसारच कामे होत आहेत. तथापि, गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ कमालीचे उत्साही असल्याने दोन्ही तालुक्यातील ६० गावांत मिळून १ लाख घनमीटरच्या क्षेत्रात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये शेताची बांधबंदिस्ती, शेततळे, सीसीटी, माती नाला बांध, एलबीएस बंधारे, सीसीटीसह पाणलोट उपचारांच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी काही ठिकाणी जेसीबी, पोकलॅण्ड मशीनचा आधारही घेण्यात आला असून, झालेल्या कामांमुळे संबंधित गावातील भूजल पातळी वाढून भावी काळात पाणीटंचाई आणि दुष्काळावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाMangrulpirमंगरूळपीरKaranjaकारंजा