शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून साकारली जलसमृध्दी ; २० गावातील ग्रामस्थांचे श्रम लाभले सार्थकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:55 IST

मंगरुळपीर  :  पाणी फांउडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी मंगरूळपीर तालुक्यातील सहभागी गावात राबविण्यात आली.

ठळक मुद्दे श्रमदानातून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करत ४५ दिवसात तापत्या उन्हात जलसंधारणाची कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली. या कामातून २० गावातील ग्रामस्थांचे श्रमदानातून जलसमृध्दी साकारली असून त्यांचे श्रम सार्थकी लाभल्याचे नुकत्याच झालेल्या पावसावरुन दिसून येते.साचलेल्या पाण्याजवळ श्रमदान करणारे ग्रामस्थ सेल्फी काढून आनंद व्यक्त करीत आहेत.

- नाना देवळे । मंगरुळपीर  :  पाणी फांउडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी मंगरूळपीर तालुक्यातील सहभागी गावात राबविण्यात आली. दुष्काळाच्या स्पर्धेदरम्यान गावक-यांना श्रमदानातून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करत ४५ दिवसात तापत्या उन्हात जलसंधारणाची कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली. या कामातून २० गावातील ग्रामस्थांचे श्रमदानातून जलसमृध्दी साकारली असून त्यांचे श्रम सार्थकी लाभल्याचे नुकत्याच झालेल्या पावसावरुन दिसून येते. साचलेल्या पाण्याजवळ श्रमदान करणारे ग्रामस्थ सेल्फी काढून आनंद व्यक्त करीत आहेत.गत तीन ते चार दिवसांपासून जिल्हयात पावसाने चांगलीच हजेरी लावली.  मंगरूळपीर तालुक्यातील २५ गावात श्रमदान व यत्रांच्या सहायाने जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात झाली. पावसाचे पाणी जमिनिवर पडल्यानंतर वाहून जाते. परीणामी गावकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. धावणाºया पाण्याला चालायला शिकवणे व चालणाºया पाण्याला थांबायला शिकविणे व थांबलेल्या पाण्याला मुरवायला शिकविणे. या पाणी फांउडेशनच्या सुत्रानुसार  मंगरूळपीर तालुकयातील ५९ गावकºयांनी सत्यमेव जयते वॉटर कपचे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यापैकी लखमापुर, बोरवा, सायखेडा, शेदुरजना, वनोजा, पिंपळखुटा संगम, धोत्रा, गणेशपुर, म्हसोला, लाठी, तपोवन, वनोजा, कोठारी, घोटा, माळशेलु, नागी, ईचा, शेलगाव, जांब, मोहरी या २०  गावाला जलंसंधारणाची कामे यत्रांच्या व श्रमदानाच्या माध्यमातून झाली. स्पर्धेदरम्यान गावकºयांनी ४५  दिवस श्रमदान करून आपल्या गावात सि.सि.टी, डिप.सि.सिटी, नाला खोलीकरण, शेततळे ,गॉबीयन बंधारा, एल.बी.एस आदी जलसंधारणाची कामे  केली. गावकºयांनी श्रमशक्ती वापरून गावात पाणी साठा निर्माण करण्यासाठी जी जलपात्रे तयार केलीत. त्यात फक्त वाट होती पावसाची,  पावसाने गेल्या दोन दिवसापासून जोरदार हजेरी लावली. श्रमातून तयार केलेल्या  पात्रामध्ये मोठया प्रमाणात पाणी साठा निर्माण झाला. गावातील पाणी वाहुन गेले नाही. हे गावात साचलेले पाणी पाहुन गावकरी आनंद व्यक्त करीत आहे. त्या पाण्यासोबत सेल्फी काढून श्रमाचे पाणी त्यांच्या  दिसत आहे.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwashimवाशिम