शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या माध्यमातून घंटागाड्यांवर वाॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:47 IST

Risod News प्रभागात घंटागाडी जाते की नाही याची पडताळणी म्हणून नगरपरिषदेने सोशल मीडियाचा आधार घेत व्हाट्स ॲप ग्रुप बनविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : शहरातील कचरा संकलनासाठी असलेल्या घंटागाड्यांवर देखरेख राहावी, याकरिता नगरपरिषदेने सोशल मीडियाचा आधार घेतला असून, एका व्हाट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून वाॅच ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी घंटागाडीत कचरा टाकावा, असे आवाहन नगराध्यक्ष विजयमाला आसनकर व मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य आवश्यक असून, कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कचरा संकलन व्यवस्थित होत आहे की नाही, प्रत्येक प्रभागात घंटागाडी जाते की नाही याची पडताळणी म्हणून नगरपरिषदेने सोशल मीडियाचा आधार घेत व्हाट्स ॲप ग्रुप बनविला आहे. यामध्ये घंटागाडीचे चालक, वाहक, नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, मुख्याधिकारी गणेश पांडे, यांच्यासह आरोग्य अधिकारी, घंटागाडीवर वॉच करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे शहरात कोणत्या गल्लीमध्ये घंटागाडी किती वाजता गेली, कोणत्या गल्लीतील कचरा उचलून नेला किंवा नाही याचीही पाहणी या ग्रुपद्वारे होत आहे. गल्लीत घंटागाडी गेली किंवा नाही हे निदर्शनात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर वाॅच राहत आहे. कुठल्या गल्लीत घंटागाडी आहे, त्याचे छायाचित्र अपलोड करून वेळेनुसार ग्रुपमध्ये टाकावे लागत आहे.

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम