शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या 'रॉदिनर्स ग्रुप'चा थरार; दोनशे किलोमीटर अंतर कापले ११ तासांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 14:31 IST

 वाशिम रॉदिनर्स ग्रुपच्यावतीने आयोजित सायकलस्वारांच्या ब्रेवेट स्पर्धेत २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत वाशिम-कामरगाव-वाशिम हे २०० किलोमीटर अंतर अवघ्या ११ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. 

वाशिम ते कामरगाव 'ब्रेवेट स्पर्धा'स्पर्धेत २७ स्पर्धकांनी नोंदविला सहभाग लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  वाशिम रॉदिनर्स ग्रुपच्यावतीने आयोजित सायकलस्वारांच्या ब्रेवेट स्पर्धेत २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत वाशिम-कामरगाव-वाशिम हे २०० किलोमीटर अंतर अवघ्या ११ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. वाशिम शहरातील पाटणी चौक येथून या ब्रेवेट स्पर्धेला सकाळी ६ वाजता  सुरुवात करण्यात आली.  या स्पर्धेत छाया मडके, अलका गि-हे व रेखा रावले या तीन महिलांसह अकोला, येलदरी व वाशिम येथील एकूण २७ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर मालेगाव, शेलु मार्गे कामरगाव व पुन्हा कामरगाव, शेलु, मालेगाव व वाशिम असे २०० किमीचे अंतर स्पर्धकांनी १३.३० तास या निर्धारित वेळेपेक्षा २.३० तास कमी अर्थात ११ तासांच्या आत सायकलने कापून विक्रम प्रस्थापित केला. यातील रेखा रावले या सायकलस्वाराने वाशिम ते जम्मू या सायकल स्पर्धेत भाग घेतला होता. जगात प्रसिध्द असलेली व सायकलस्वारांना वेड लाणा-या ब्रेवेट स्पर्धेची सुरुवात वाशिम येथे आयोजित करण्याचे श्रेय वाशिम सायकलस्वार ग्रुपचे अध्यक्ष नाारायण व्यास व त्यांच्या सहका-यांना जाते. या सायकल स्पर्धेत स्पर्धकांनी सायकल चालविण्याचा थरार अनुभवला. पुढील डिसेंबर महिन्यात वाशिम येथे होणाºया ३०० किलोमीटर अंतराची ब्रेवेट स्पर्धा आयोजित करण्याचे वाशिम सायकल स्वार ग्रुपने ठरविले आहे. या ब्रेवेट स्पर्धेत सायकलस्वारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन वाशीम सायकलस्वार ग्रुपचे नारायण व्यास यांनी केले. दरम्यान, वाशिम सायकलस्वार ग्रुपच्यावतीने दरवर्षी विविध टप्प्यांच्या सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांना तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक सायकलस्वारांचा उत्स्फूर्त सहभागही लाभत असतो. ही परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार सायकल स्वार ग्रुपने केला आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडा