शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचे तीन रायफल शूटर राष्ट्रीय स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

वाशिम : अहमदाबाद (गुजरात) येथे १४ ते १९ ऑगस्ट, २०२१ या कालावधीमध्ये प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धा पार ...

वाशिम : अहमदाबाद (गुजरात) येथे १४ ते १९ ऑगस्ट, २०२१ या कालावधीमध्ये प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये रायफल शूटिंग या प्रकारामध्ये वाशिमचे ३ खेळाडूंची प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

रायफल शूटिंग स्पर्धेत मुलांपैकी क्षितिज कैलास राऊत याने ४०० पैकी ३८१, अरिहंत अरविंद घुगे, रुषभ अजय ढवळे याने प्रत्येकी ३७० गुण घेतले. अशा या तीन शूटरची प्री-नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. वाशिम जिल्ह्यात प्रथमच ३ ही निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षक प्रल्हाद आळणे, क्षितिज राऊत, अरिहंत घुगे, रुषभ ढवळे यांचा रफिक मामू, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम चव्हाण, महेश आकरे, शिक्षक अरविंद घुगे, प्रशिक्षक अनुप मानतकर, अजय ढवळे, जिम कोच सागर आळणे यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी सोनल चव्हाण, जानव्ही मानतकर, मृणाली आकरे उपस्थित होत्या. या विद्यार्थ्यांच्या निवडीचे वाशिम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्व खेळाडूंचे वाशिम जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप शंकरलाल हेडा, वाशिम रायफल क्लबचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ क्रीडापटू रफीक खान, हाजी खान, तसेच उपाध्यक्षा आशाबाई गंगाधर शिवणकर, क्लबच्या सचिव निशा गंगाधर शिवणकर, सहसचिव सागर संजय निवलकर, कोषाध्यक्ष महादेव तुर्के, सदस्य विद्याधर नानाजी मानतकर, प्रज्ञा महादेव तुर्के, संतोष आत्माराम आळणे, वैशाली संजय निवलकर, सागर रमेश आळणे, सचिन रमेश आळणे, प्रशिक्षक प्रल्हाद आळणे यांनी काैतुक केले आहे.