शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचे तीन रायफल शूटर राष्ट्रीय स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 11:30 IST

Washim's three rifle shooters at the national competition : रायफल शूटिंग या प्रकारामध्ये वाशिमचे ३ खेळाडूंची प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :   अहमदाबाद (गुजरात) येथे १४ ते १९ ऑगस्ट, २०२१ या कालावधीमध्ये प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये रायफल शूटिंग या प्रकारामध्ये वाशिमचे ३ खेळाडूंची प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. रायफल शूटिंग स्पर्धेत मुलांपैकी क्षितिज कैलास राऊत याने ४०० पैकी ३८१, अरिहंत अरविंद घुगे, रुषभ अजय ढवळे याने  प्रत्येकी ३७०  गुण घेतले. अशा या तीन शूटरची प्री-नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. वाशिम जिल्ह्यात प्रथमच ३ ही निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षक प्रल्हाद आळणे, क्षितिज राऊत, अरिहंत घुगे, रुषभ ढवळे यांचा रफिक मामू, महावितरणचे अतिरिक्त  कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम चव्हाण, महेश आकरे, शिक्षक अरविंद घुगे, प्रशिक्षक अनुप मानतकर, अजय ढवळे, जिम कोच सागर आळणे यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी सोनल चव्हाण, जानव्ही मानतकर, मृणाली आकरे उपस्थित होत्या. या विद्यार्थ्यांच्या निवडीचे वाशिम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्व खेळाडूंचे वाशिम जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप शंकरलाल हेडा, वाशिम रायफल क्लबचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ क्रीडापटू रफीक खान, हाजी खान,  तसेच उपाध्यक्षा आशाबाई गंगाधर शिवणकर, क्लबच्या सचिव निशा गंगाधर शिवणकर, सहसचिव सागर संजय निवलकर, कोषाध्यक्ष महादेव तुर्के, सदस्य विद्याधर नानाजी मानतकर, प्रज्ञा महादेव तुर्के, संतोष आत्माराम आळणे, वैशाली संजय निवलकर, सागर रमेश आळणे, सचिन रमेश आळणे, प्रशिक्षक प्रल्हाद आळणे यांनी काैतुक केले आहे.

टॅग्स :washimवाशिम