सुनील काकडे / वाशिम: आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. याच तंत्रज्ञानाची कास धरत स्थानिक नगर परिषदेनेही आपला कारभार सुधारण्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल सु्न३ केली आहे. वाशिमची नगर परिषद या ना त्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहते. त्यातही अधिकांशवेळा विकासकामाकडे पालिकेकडून होणार्या दुर्लक्षाला नेहमीच शहरवासीयांकडून मार्क केले जाते. हळूहळू का होईना, वाशिम नगर परिषदेचा कारभारही सुधारत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्यासह त्यांच्या प्रशासकीय चमूकडून कायह्यद्याह्णचे बोलाऐवजी खरोखरच ह्यकायद्याह्णचे पालन केले जात असल्याचे दिसून येत आहे. वाशिम नगर परिषदेत होणार्या विविध सभांचे सदस्यांना निमंत्रण देण्याकरिता पूर्वी ह्यनोटीसह्ण काढली जायची. एखाद्या कर्मचार्याकडून ती नोटीस प्रत्येक सदस्याच्या घरी पाठविली जायची. आज मात्र बदलत्या काळासोबत पालिकेची ही पद्धतही बदलली आहे. सध्या मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी ह्यसोशल मीडियाह्णमधील प्रभावी साधन म्हणून ओळखल्या जाणार्या ह्यव्हॉट्स अँपह्णवर पालिकेतील सर्व सदस्यांना ह्यअँडह्ण करुन सभेचे निमंत्रण या माध्यमातून देणे सुरु केले आहे. यामुळे कर्मचार्यांवर खर्ची होणारा वेळ आणि पैशामध्ये बचत झाली आहे. नगर परिषदेतील सभांमध्ये होणारे महत्त्वपूर्ण निर्णय, ठराव यासह इतर विकासकामांसंबंधीची माहिती गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर अपलोड केली जात आहे. यामुळे बंद खोल्यांमध्ये होणार्या सभांमधील महत्त्वाच्या चर्चा सर्वसामान्यांपर्यंत क्षणात पोचत आहेत. म्युनिसीपल कौन्सील वाशिम या नावाने असलेल्या ह्यफेसबुक अकाऊंटह्णवर शहरातील असंख्य नागरिक जुळले गेले आहेत. यामुळे कामातील पारदर्शकतेसोबतच नागरिकांची नकारात्मक मानसिकता देखील सकारात्मक होत आहे.
वाशिम पालिका होतेय ‘हायटेक’
By admin | Updated: May 22, 2015 02:03 IST